28 C
Mumbai
Friday, January 24, 2025
Homeराजकीयअजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्यात ढेरीवरून कोपरखळ्या

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्यात ढेरीवरून कोपरखळ्या

राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका देखील झाल्या. या निवडणुकीत छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात कमळ फुलले आहे. यामुळे आता याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार का? अशा चर्चा आहेत. आगामी निवडणुकांचा वेध घेता आता सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असलेला पाहायला मिळाला होता. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या ढेरीवरून वक्तव्य केलं होतं, यावर आव्हाडांनीही पलटवार करत जशास तसं उत्तर अजित पवारांना दिलं आहे.

अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या सभेत शरद पवार गटांच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली होती. जितेंद्र आव्हांडांचं पोट पावसात भिजल्यावर कसं दिसतं, अशी मिश्कील टीका अजित पवारांनी केली होती. या टीकेवर जितेंद्र आव्हाडांनी कसला बालिशपणा लावला आहे, काय भाषणं करतायं? तुम्हाला काय 6 पॅक्स अॅब्स आहेत का? अशी मिश्कील टीका आव्हाडांनी केली, एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांचा फोटो देखील ट्विट करत अजित पवारांवर वाढणाऱ्या ढेरीवरून कोपखळ्या मारल्या आहे. यावर आता जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांची टर उडवली आहे.

हे ही वाचा

चेन्नईत मिचाँग चक्रीवादळाने पूर; जिकडं तिकडं पाणीच पाणी

‘विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी’

‘शासन आपल्या दारीचे महत्त्व घरात बसलेल्यांना काय कळणार’?

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आव्हाडांनी अजित पवारांचं पोट दिसत असलेला एक फोटो ट्विट केला आहे. एका कार्यक्रमात अजित पवार आपले दोन्ही हात उंचावून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 पॅक अॅब्स केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो’, अशा कॅप्शनसहीत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांची फिरकी घेतली आहे, मी आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता मग माझ्यावर दर वेळेस वैयक्तिक टीका कश्यासाठी? असा प्रश्न आव्हाडांनी केला आहे. यावर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी