28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनDebina Bonarjee : दुसऱ्यांदा आई होणाऱ्या अभिनेत्रीने ट्रोलर्सना लगावली चपराक

Debina Bonarjee : दुसऱ्यांदा आई होणाऱ्या अभिनेत्रीने ट्रोलर्सना लगावली चपराक

काही महिन्यांपूर्वीच आई बनलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबीना बॅनर्जी हिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. देबीना बॅनर्जी हिने चार महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. पण काही सोशल मीडिया युझर्सकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

मनोरंजन क्षेत्रात सध्या अनेक अभिनेत्री आई बनत आहेत. अनेक अभिनेत्री आपल्या ‘बेबी बंप’चा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही महिन्यांपूर्वीच आई बनलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबीना बॅनर्जी (Debina Bonarjee) हिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. देबीना बॅनर्जी हिने चार महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यातच देबीना पुन्हा आई होणार असल्याने काही सोशल मीडिया युझर्सकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. पण आता अशा या ट्रोलर्सना देबीनाने सुनावले आहे. एका युझरला तर चक्क तिने ‘मी काही महिन्यांतच पहिल्या बाळाला जन्म देऊन आई होत असल्याने आता काय अबॉर्शन करू का ?’ असा प्रश्न उपस्थित करत सुनावले आहे.

देबीना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. देबीना आणि तिचा पती अभिनेता गुरमीत चौधरी हे चार महिन्यांपूर्वीच एका मुलीचे आई-बाबा बनले. त्यांनी त्यांच्या मुलीचे ‘लियाना’ असे नाव ठेवले आहे. देबीनाने तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये तिचे नेहमीचे अपडेट तिच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून तुच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले होते. त्याचप्रमाणे आता सुद्धा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, देबीना बॅनर्जीच्या या पोस्टनंतर काही सोशल मीडिया युझर्सने तिला ट्रोल केले आहे. पण या ट्रॉलर्सना देबीनाने तिच्या पद्धतीने उत्तर देत गप्प केले. देबीनाने तिच्या दुसऱ्यांदा आई होण्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिने एक सोशल मीडिया लाईव्ह ठेवले होते. यामध्ये तिने तिच्या या लाइव्हवर आलेल्या प्रश्नांची बिनधास्तपणे उत्तरे सुद्धा दिली.

हे सुद्धा वाचा

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

P. L. Deshpande Kala Academy : पु. ल. देशपांडे कला अकादमीला मिळते लाखो रुपयांचे भाडे, तरी आहे सुविधांचा अभाव

यावेळी एका व्यक्तीने तिला ‘तू दुसरं बाळ ठेवण्याआधी लियानाला थोडा वेळ द्यायला हवा होतास,’ असा प्रश्न विचारला. यावर देबीनाने उत्तर देत म्हंटले की, ‘जुळे बाळ असते तर काय केलं असतं ?’ तर दुसऱ्या एका युझरने देबीनाच्या पहिल्या प्रेग्नन्सीवर प्रश्न उपस्थित केले अंडी म्हंटले की, तुला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. तुला नाही वाटत का ? पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्यामध्ये कमीत कमी वर्ष भराचे अंतर असायला हवे होते.’ यांवर देबीनाने उत्तर दिले की, ‘मी या गोष्टीला देवाचा चमत्कार मानेल. पण आता आपण मला काय सांगू इच्छिता की, मी अबॉर्शन करावे का ?’ देबीनाच्या या उत्तरावर मात्र अनेक ट्रोलर्सची बोलती बंद झालेली दिसत आहे.

दरम्यान, देबीना आणि गुरमीत हे तब्बल ११ वर्षानंतर आई-बाबा बनले आहेत. देबीनाला तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी चिंता व्यक्त केली होती. पण आता दुसऱ्यांदा आई-बाबा होणाऱ्या या जोडप्याने मात्र आता आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी