31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमनोरंजनडंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

डंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

बॉलिवूडच्या डंकी (Dunki) या सिनेमाने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा सिनेमा अजूनही बॉक्स आॉफिसवर दमदार कामाई करत आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान, बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan) आहे. शाहरूखने २०२३ या वर्षामध्ये पठाण, जवान आणि डंकीसारख्या चित्रपटांनी कोट्यवधीमध्ये कामाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आहे. आता डंकी हा चित्रपट लवकरच ऑस्करच्या शर्यतीत (Oscar2024) असणार असल्याची केवळ चर्चा आहे. चित्रपटाचे निर्माते आपल्या चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत दाखल करणार असल्याचं केवळ बोललं जात आहे. मात्र यावर अजून अधिकृत माहिती समोर आली नाही.

डंकी ऑस्करच्या शर्यतीत

डंकी या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. देशामध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली असून आता हा सिनेमा लवकरच ९६ व्या ऑस्करच्या अवॉर्ड सोहळ्यामध्ये एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे. डंकी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटामध्ये विनोद तर कधी भावनिक परिस्थिती दाखवली आहे. परदेशामध्ये अवैध मार्गाने जाणाऱ्या एका मुलाबाबत ही गोष्ट असून याचं सर्विकडे कौतुक केलं जात आहे.

हे ही वाचा

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

मनोज मौनिक हे एकनाथ शिंदेंचे नवनिर्वाचित ‘प्रधान सल्लागार’

ना हिंदू ना मुस्लिम आयरा आणि नुपूर शिखरेनं केलं ख्रिश्चन पद्धतीनं लग्न

डंकी या सिनेमाच्या कमाईबद्दल विचार केल्यास २२० कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे देशभरामध्ये या सिनेमाची क्रेझ पाहाया मिळत आहे. अशातच केवळ २२ दिवसांमध्ये डंकी या सिनेमाने ४३५.५ कोटींचा गल्ला जमावला आहे. लवकरच ५०० कोटींचा आकडा हा सिनेमा पार करेल असा अंदाज आहे.

२०२४ ऑस्कर पुरस्कार कधी?

ऑस्कर पुरस्कार हा यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये ११ मार्च रोजी आहे. ऑस्कर अवॉर्डला चित्रपट क्षेत्रामध्ये खूप मोठा मानसन्मान आहे. यामध्ये काही ठराविक आणि अर्थपूर्ण सिनेमांची निवड केली जाते. यामध्ये डंकी या सिनेमाची एन्ट्री करण्यासाठी निर्माते झटत आहेत.  मागील वर्षी दक्षिण भारतातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ठ ओरिजनल सॉंग ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. दरम्यान ही सिनेमा फेब्रुवारीध्ये जिओ सिनेमावर ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी