30 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeमनोरंजनना हिंदू ना मुस्लिम आयरा आणि नुपूर शिखरेनं केलं ख्रिश्चन पद्धतीनं लग्न

ना हिंदू ना मुस्लिम आयरा आणि नुपूर शिखरेनं केलं ख्रिश्चन पद्धतीनं लग्न

काही दिवसांआधी बॉलिवूड अभिनेता अमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) आणि जावई नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचं कोर्ट मॅरेज झालं होतं. यावेळी नुपूरने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातली होती. याच कपड्यांवर त्याने आपलं कोर्ट मॅरेज केलं. यानंतर आयरा आणि नुपूर शिखरेचा  शाही विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडला आहे. अनेक चाहत्याचं लक्ष वेधून घेणारा हा शाही विवाहसोहळा आहे. अनेकांना वाटलं होतं आयरा आणि नुपूर हे हिंदू की मुस्लिम पद्धतीनं लग्न करतील. मात्र आता त्यांनी दोन्हीही पद्धतीनं लग्न न करता, ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. ( Ira Khan Nupur Wedding)

आयरा आणि नुपूर हे दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. नुपूर हा जिमट्रेनर आहे. त्यानं अमिर खानलाही जिममध्ये ट्रेन केलं आहे. त्यांनी याआधी साखरपुडा करून लग्नगाठ बांधली आहे. आणि ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला आहे. त्यांच्या विवाहाचे फोटो सर्वत्र व्हयरल होऊ लागले आहेत. यावेळी आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर नुपूरने राखाडी रंगाचा कोट घातला आहे. दोघेही आनंदी दिसत आहेत. आयराच्या हातात बुके असून दोघेही रेड कार्पेटवरून चालताना दिसत आहेत.

हे ही वाचा

‘खरी शिवसेना शिंदेंचीच’, मुख्यमंत्रीपद वाचलं, १६ आमदार पात्र ठरल्याने जीवनदान

संदीप लामछानेला आठ वर्षांचा तुरूंगवास

लोकशाही मराठी वृत्तवाहीनीवर दडपशाही, चॅनेल ३० दिवसांसाठी राहणार बंद

रीना दत्ता आणि किरण राव उपस्थित

आयरा आणि नुपूरच्या विवाहासाठी रीना दत्ता आणि किरण राव यांनी देकील उपस्थिती दर्शवली. तसेच वधू आणि वराने डान्स करत उपस्थित मंडळींचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केल्याने अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. दरम्यान आता आयरा आणि नुपूरचे मुंबईमध्ये रिसेप्शन होणार आहे. 

मुंबईमध्ये आयर आणि नुपूरचे रिसेप्शन

१३ जानेवारी या दिवशी आयरा आणि नुपूर शिखरेचं रिसेप्शन होणार आहे. हे रिसेप्शन मुंबईमध्ये जियो वर्ल्ड ग्रॅंड येथे होणार असून याठिकाणी अनेक बॉलिवूड अभिनेते उपस्थित राहणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी