27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल'

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh bangar) हे नेहमीच कोणात्या न् कोणत्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यापासून बांगर शिंदे गटात गेले आहेत. तेव्हापासून बांगर नवनवीन वक्तव्य करतच आहेत आणि चर्चेत येत आहेत. अनेकदा तर त्यांच्या वक्तव्याने तर वाद देखील झाला आहे. मात्र आता त्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. याआधी त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. आता तर संतोष बांगर यांनी थेट नरेंद्र मोदींबद्दल चॅलेंज केलं आहे. जर पुन्हा नरेंद्र मोदी (Narendra modi) पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. या चॅलेंजनं राजकीय वर्तुळामध्ये अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

संतोष बांगर हे हिंगोली तालुक्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. बांगर हे नेहमी कोणते न् कोणते चॅलेंज देत असतात. अनेकदा ते आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. मात्र आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान नझाल्यास स्वत:च भर चौकामध्ये फाशी घेत जिव देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. अनेकदा त्यांनी मिशी कापण्याबाबतही चॅलेंज दिलं होतं, तर आता मात्र त्यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदावरून आणि स्वत:च जिव देणार असल्याचं भाष्य केलं आहे.

हे ही वाचा

मनोज मौनिक हे एकनाथ शिंदेंचे नवनिर्वाचित ‘प्रधान सल्लागार’

ना हिंदू ना मुस्लिम आयरा आणि नुपूर शिखरेनं केलं ख्रिश्चन पद्धतीनं लग्न

‘खरी शिवसेना शिंदेंचीच’, मुख्यमंत्रीपद वाचलं, १६ आमदार पात्र ठरल्याने जीवनदान

‘तर मिशी ठेवणार नाही’

कळमनुरी मतदारसंघामध्ये निवडून न आल्यास मिशी काढणार असल्याचं चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. महाविकास आघाडीने एकून १२ जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीची चर्चा ही देशभर होती.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांना निवडणुकीसाठी तिकिट दिलं. ते कळमनुरी मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर काही वर्षात सत्ता संघर्षावरून एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गेले. पण त्यावेळी ते गुवाहटीला न जाता अंतिम स्थितीत ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी