28 C
Mumbai
Friday, July 26, 2024
Homeराजकीयतरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

तरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

येत्या २२ जानेवारी दिवशी प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आयेध्येला देशभरातून भक्त जाणार आहेत. या दिवशी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा असणार आहे. सध्या राम मंदिर हे विविध कराणांसाठी चर्चेत आहे. मुंबईच्या एका मुस्लिम मुलीनं रामलल्लाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याची माहिती दिली. अशातच एक झारखंड येथील आजीबाईने ३० वर्षे राम मंदिर पूर्ण होण्यासाठी मौनव्रत केलं. त्या २२ तारखेला श्रीरामाच्या चरणी जावून व्रत सोडणार आहेत. यामुळे सध्या राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक गाजताना दिसत आहे. अशातच यासाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खांदेशातील एक तरूण पुणे ते आयोध्या सायकलवरून वारी करणार आहे. यामुळे राम मंदिराचा येणारा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

आशिष दुसाने असं अमळनेर येथील राहणाऱ्या तरूणाचं नाव असून तो पुणे ते आयोध्या सायकलवरून उद्घाटन सोहळ्यासाठी जाणार आहे. ही त्याची संकल्पयात्रा सुरू असल्याचं म्हटलं आहे. अमळनेर येथे आशिषचं राम भक्तांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आशिष हा अमळनेरचा रहिवाशी असून पुण्यामध्ये एमपीएससी यूपीएससीचे मार्गदर्शन करतो.

हे ही वाचा

डंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

मनोज मौनिक हे एकनाथ शिंदेंचे नवनिर्वाचित ‘प्रधान सल्लागार’

आशिषने जुन्नर येथील माती आणि पाणी घेऊन संकल्प यात्रेला सुरुवात केली. आशिष हा सायकलवरून जुन्नरवरून संगमनेर, कोपरगाव, मालेगाव, धुळे, अमळनेर येथे संत सखाराम महाराज, मंगळग्रह मंदिराचे दर्शन घेऊन इंदौर, उज्जैन, बागेश्वर धाम, मिर्झापूर, काशी, प्रयागराज, सुलतानपूर, प्रतापगड मार्गे अयोध्येला जाणार आहे.

राम मंदिराचा मुद्दा गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तो आता २२ जानेवारी दिवशी सुटणार आहे. यासाठी अनेक भारत वासियांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे. अनेक वर्षांपासूनचे भारतवासियाचं स्वप्न आता हे स्वप्न न राहता सत्यात उतरणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी सांगितली आहे. मात्र असं असलं तरीही  राम मंदिराच्या मुद्द्याला राजकीय रंग प्राप्त होत असल्याचा विरोधकांकडून हल्ला होत आहे. कारण या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्घाटनासाठी अजूनही निमंत्रण न दिल्याने राम मंदिरावर राजकीय शंका व्यक्त केली जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी