28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनGangs of wasseypur Actor Booked : गॅंग्ज ऑफ वासेपूरच्या 'या' अभिनेत्यावर गुन्हा...

Gangs of wasseypur Actor Booked : गॅंग्ज ऑफ वासेपूरच्या ‘या’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल, कारण ऐकून व्हाल थक्क

जीशान फसवणुकीबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 या वर्षी अंबोली पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा जीशानच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा कलम 420 अंतर्गत दाखल झाला होता. सिनेनिर्माता-फायनान्सर जतीन सेठीने 1.5 करोड रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप जीशानवर केला होता. 

‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’चा लेखक आणि अभिनेता जीशान कादरी (Zeishan Quadri) याला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. चोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या मालाड येथील पोलिस स्टेशनमध्ये जीशान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिनेनिर्मात्या आणि फायनान्सर शालिनी चौधरी यांनी फसवणुकीचा आरोप केला असून तब्बल 26 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, शिवाय कार चोरल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केला आहे. शालीनी यांच्या आरोपामुळे जीशान कादरीच्या अडचणी आता वाढणार आहेत. गॅंग्ज ऑफ वासेपूरला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेत भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीने गॅंग्ज ऑफ वासेपूर लिहिले त्याच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने प्रेक्षकांमध्ये उलट – सूलट चर्चा सुरू झाली आहे.

जिशान कादरीवर चोरीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या शालिनी चौधरी म्हणतात, मी माझ्या दोन्ही मुलांसोबत मालाडला राहते. माझी स्वतःची शालिनी चौधरी फिल्म Shalini Choudhary Films नावाची कंपनी आहे. 2017 साली जीशान कादरीला मी भेटले होते. त्याला सोनी एंटरटेन्मेंटवरील शो ‘क्राइम पेट्रोल’साठी आर्थिक सहाय्य हवं होतं. त्याची एक कंपनी Friday to Friday मध्ये त्याची पत्नी म्हणून स्वतःची ओळख करून देणारी मैत्रीण प्रियंका बस्सी देखील पार्टनर होती. आम्ही क्राइम पेट्रोल शो साठी एकत्र काम केलं आणि त्याच्या कंपनीच्या ‘हलाल’ सिनेमाशी देखील मी जोडले गेले होते. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास होता, असे म्हणून त्यांनी जीशानशी कशी ओळख झाले ते सांगितले.

हे सुद्धा वाचा…

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

Maharashtra Assembly Session : सभागृहात मंत्री विजयकुमार गावितांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन, विरोधक चिडले

Nitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून ‘टोल’ ची रक्कम वसूल होणार – नितीन गडकरी

पुढे शालिनी म्हणाल्या, जीशान कादरी आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी सोनी टीव्ही वर येणाऱ्या एका कॉमेडी शोचं पार्टनर बनण्यासाठी आपल्याला गळ घातली होती. जीशानने त्यावेळी शालिनीला म्हटलं होतं की, शो साठी काम करण्यासाठी त्याच्याकडे कार नाही. तो चांगल्या कारच्या शोधात आहे, असे म्हणून जीशान आणि त्याच्या पत्नीने शालिनी यांचा विश्वास संपादन करून त्यांची Audi-A-6 कार मिळवली, त्या कारचा नंबर MH14 FM 3212 असा आहे. काही काळानंतर कार साठी शालिनी यांनी जीशानला काॅल केला परंतु त्यांनी काॅल घेणेच टाळले, इतकेच काय त्यावर कोणताच प्रतिसाद सुद्धा दिला नाही.

जीशान कादरीवरचा हा पहिला आरोप नाही. याआधी 2020 या वर्षी अंबोली पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा जीशानच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा कलम 420 अंतर्गत दाखल झाला होता. सिनेनिर्माता-फायनान्सर जतीन सेठीने 1.5 करोड रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप जीशानवर केला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी