31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनगौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण

गौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण

राज्यात सध्या मराठा आरक्षणावर वातावरण चांगलंच तापलं आहे. काही महिन्यांपासून मराठा समाजाने सरकारकडे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात सामावून घ्यावं अशी मागणी केली होती. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा विरोध आहे. यामुळे राज्यात मराठा आरक्षणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील महाराष्ट्र दौरे करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने सरकारला (२४ डिसेंबर) शेवटची तारीख दिली आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही यावर कोणतीही माहिती समोर आली नाही.

अशातच आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटीलने मला आरक्षण हवं असल्याचं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, मलाही आरक्षण हवं असल्याचे गौतमी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाली आहे. यामुळे आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. या वक्तव्याने मराठा आरक्षणाच्या मागणीत किती फरक पडेल हे येत्या २४ डिसेंबर दिवशी लक्षात येईल अशा चर्चा केल्या जात आहेत.

हे ही वाचा

नागपूरच्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात माथाडी कामगारांचा प्रश्न तापणार !

नवी मुंबईत सार्वजनिक बसमध्ये फोनवर बोलण्यास बंदी; गाणी जोरात वाजवाल तर गाठ पोलिसांशी

अतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

काय म्हणाली गौतमी?

मध्यामांशी बोलत असताना गौतमी पाटीलला मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं का? असा प्रश्न विचारला असता गौतमी पाटील उत्तरली आहे. होय, मला आरक्षण हवं आहे. त्यानंतर जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याबाबत विचारलं असता, गौतमी म्हणाली की मला यावर काहीही बोलायचं नाही. मला यात तुम्ही ओढू नका. मला आरक्षण हवं आहे, यामुळे सर्वांना आरक्षण हवं असल्याचं गौतमी पाटील म्हणाली आहे. तुला कुणबी प्रमाणपत्र हवं का? असा प्रश्न माध्यमांनी गौतमीला विचारला असता, गौतमीने होकारार्थी मान हलवत सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अभिनेत्यांनी देखील उडी घेतली होती. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार आणि मराठी चित्रपटसृष्टीला वेड लावणारा अभिनेता रितेश देशमुखनने ट्विट करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आपल्या भावना ट्विटद्वारे व्यक्त केल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी