28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमुंबईनवी मुंबईत सार्वजनिक बसमध्ये फोनवर बोलण्यास बंदी; गाणी जोरात वाजवाल तर गाठ...

नवी मुंबईत सार्वजनिक बसमध्ये फोनवर बोलण्यास बंदी; गाणी जोरात वाजवाल तर गाठ पोलिसांशी

नवी मुंबई परिवहन महामंडळात (एनएमएमटी) (NMMT) प्रवास करणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी एक नवीन माहिती समोर येत आहे. बसमधून प्रवास करताना मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्यास त्याचप्रमाणे मोबाईलवर मोठ्याने गाणी वाजवणाऱ्यावर निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती आता परिवहन संस्थापक योगेश कोडूसकर यांनी परिपत्रक जारी केलं आहे. त्या परिपत्रकात त्यांनी मोबाईलवर गाणी वाजवणे तसेच मोठ्याने बोलणे याबाबतची माहिती नमूद केली आहे.

काय आहे परिपत्रकात?

नवी मुंबई परिवहन मंडळाने प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि व्यवस्थित व्हावा यासाठी नवीन नियमावली आखली आहे. अनेकदा बसमध्ये प्रवाशांमध्ये वाद-विवाद झाल्याची घटना अनेकदा पाहायला मिळते. त्याची काही कारणं आहेत. अनेकदा मोबाईलवर मोठ्याने लावलेल्या गाण्यांमुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. तर अनेकदा मोबाईलवर मोठ्याने बोलल्याने देखील इतर प्रवाशांचे मन विचलित होऊन प्रवाशांसाठी त्रासदायक बाब ठरते.

त्याचप्रमाणे व्हिडिओ देखील न वाजवता तसेच मोठ्या आवाजात गाणी न वाजवता प्रवास करावा. यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. अनेकदा मोबाईलचा आवाज वाढवून अन्य प्रवाशांना त्रास होतो अशातच सध्या अधिकाधिक स्मार्टफोन मोबाईलचा वापर होत असल्याने आवाजाची पातळी वाढवून लोक स्मार्टफोन हाताळतात, मात्र यामुळे काहींना ते नकोसे असते, यासाठी हा नवीन नियम जारी केला आहे. याचे कारणही आता समोर आलं आहे.

हे ही वाचा

‘अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले’?

‘सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय’?

अतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

अनेकदा मोठ्याने बोलणे, व्हिडिओचा आवाज वाढवणे आणि गाण्याचा आवाज वाढवणे हे अनेकदा इतर प्रवाशांना त्रासदायक असून लक्ष विचलित करणारं आहे. यामुळे परिपत्रकात मोठ्याने मोबाईलवर आवाज वाढवणे, बोलणे यावर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती परिपत्रकात नमूद केली आहे.

नियमांचे उल्लघन केल्यास गाठ पोलिसांशी

या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशांवर मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८/१,२ व ११२) कारवाई होऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे. नवी मुंबई परिवहन मंडळाने अखून दिलेल्या नियमावर काटेकोरपणे चालक, मालक आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी