22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeराजकीयरोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काही मागण्या

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काही मागण्या

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपुर अशी ८०० किमीची पायपीट करत युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरूणांचे प्रश्न जाणून घेण्याचं काम केलं आहे. २४ ऑक्टोंबर दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी युवा संघर्ष यात्रेची सुरूवात केली आणि शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्याच उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा शेवटही नागपुर येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी अनेक राज्यातील तरूणांशी संवाद साधत सरकारकडे तरूणांचे प्रश्न मांडण्याकडे रोहित पवारांचा कल असून युवा संघर्ष यात्रेचा हाच उद्देश होता. या संघर्ष यात्रेमध्ये रोहित पवारांनी काही मागण्या केल्या असून त्या मागण्या त्यांनी ट्विटवर देखील शेअर केल्या आहेत.

रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेत केलेल्या महत्वाच्या मागण्या

२ लाख लोकांमध्ये प्रत्यक्षपणे जाऊन लोकांनी केलेल्या मागण्या

१) सरकरने मराठा आरक्षण द्यावं आणि धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.

२) नोकर भरतीसाठी घेण्यात येणारे परिक्षा शुल्क लवकरात लवकर कमी करावे, अवाजवी शुल्क परत करण्यात यावे.

३) प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्यात राजस्थान आणि उत्तराखंड या राज्याच्या धर्तीवर कठोर कायदा करण्यात यावा.

४) अतिवृष्टीमुळे शेतीचे तातडीने पंचनामे करून घ्यावे आणि लवकरात लवकर मदत करावी दुष्काळातील दोन्ही जीआरमधील तफावत दूर करून सर्व महसूल मंडळांना NDRF निकशांच्या चारपट मदत घ्यावी, या प्रमुख चार मागण्यांवर रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरूणांचे आणि सामान्यांच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा केला आहे.

हे ही वाचा

गौतमी पाटीलला हवंय मराठा आरक्षण

नागपूरच्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात माथाडी कामगारांचा प्रश्न तापणार !

नवी मुंबईत सार्वजनिक बसमध्ये फोनवर बोलण्यास बंदी; गाणी जोरात वाजवाल तर गाठ पोलिसांशी

थोडसं संघर्ष यात्रेबाबत

युवा संघर्ष यात्रा ही ३२ दिवसांची होती. यामध्ये तरूणांचे आणि सामान्यांचे प्रश्न आणि मागण्यांना जाणून घेण्यासाठी युवा संघर्ष यात्रेची सुरूवात करण्यात आली. यासाठी दररोज २५ किमीहून अधिक प्रवास झाला. त्याचप्रमाणे यामध्ये १० हून अधिक जिल्हे, २० हून अधिक तालुके आणि ४०० गावांचा समावेश या संघर्ष यात्रेत होता. २ लाख लोकांमध्ये प्रत्यक्षपणे जाऊन लोकांनी केलेल्या मागण्या समोर आल्या आहेत, हाच उद्देश संघर्ष यात्रेचा असल्याच्या चर्चा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी