33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
HomeमनोरंजनPankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ...

Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजाराने निधन

आपल्या आवाजाने अनेक वर्षे संगीतप्रेमींवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी उधास कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. पंकज उधास यांचं ‘चिठ्ठी आई है…’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्यात तितकंच लोकप्रिय आहे. पंकज उधास यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

पद्मश्री पुरस्कारानं पंकज यांना सन्मानित करण्यात आले होते. पंकज यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “सगळ्यांना हे सांगायला खूप दु:ख होत आहे की पद्मश्री पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. दीर्घकाळ आजारी होते.”

हेही वाचा : Entertainment : “मीदेखील सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलणार होतो, पण…”, विवेक ओबेराॅयने सांगितला आयुष्यातला ‘तो’ किस्सा

उधास यांचा जन्म 17 मे 1951 साली गुजरातच्या जेतपुर येथे झाला. तिन भावंडामधील पंकज सर्वात छोटे भाऊ होते. राजकोट जवळील चरखाडी येथे त्यांचं कुटुंब राहत होते. त्यांचे आजोबा जमीनदरा होते. त्यांचे भावनगर येथे दिवाणही होते. तर त्यांचे वडील केशुभाई हे सरकारी कर्मचारी होते. त्यांची आई जितुबेन यांच्या गाण्याची प्रचंड आवड होती. तसंच त्यांच्या दोन्ही भावांचा कल हा संगीताकडे होता.

हेही वाचा : “जरांगे-पाटलांचा कालचं सगळं नाटक आणि तमाशा होता”, अजय बारसकरांचा हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी