30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनउत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. आज गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर गुडीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे. आज सकाळपासूनच गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नागपूर आदी शहरांमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. आज सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. (Gudipadwa 2023)

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

गुडीपाडव्याला मुंबईकर गिरगावमधील शोभायात्रेत जमले. ढोला ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगावमध्ये गुढीपाडव्याचं आयोजन केलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर कोपिनेश्वर मंदिरात श्री शिवशंकराचे दर्शन घेत नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निघणारी पालखी खांद्यावर घेत स्वागतयात्रेला सुरुवात केली. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, लेझीमच्या तालावर मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येकजण एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा देताना दिसत होता.

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून गुढी पाडवा साजरा केला. यावेळी फडणवीस हेही नागपूरमधील शोभात यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता. शोभा यात्रेत नागपूरकरांनी फुगड्यांचा फेर धरला. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देत, कोविड महामारीनंतर आम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

पनवेलकरांची बुधवारची गुढीपाडव्याची पहाट ढोलताशांच्या स्वरानेच सूरु झाली. शहरातील मुख्य चौकांमध्ये भगव्या पताक्यांनी रस्ते सजविण्यात आले होते. उंच काठीवर भगवा झेंडा फडकवून त्या झेंडा काठीचे वेगवेगळे नृत्याचे प्रकार यावेळी तरुणांकडून केल्या जात होत्या. मागील दोन वर्षे करोनासाथरोगामुळे शोभायात्रेवर निर्बंध होते. यंदाच्या शोभायात्रेतील सर्वच वयोगटातील व्यक्तींचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसला.

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

पुण्यातही हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ‘हिंदू नववर्ष समिती’तर्फे शहराच्या मध्यभागी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंडई मधून या शिभ यात्रेला सुरुवात झाली आणि तांबडी जोगेश्वरी येथे या यात्रेची समाप्ती होईल. या शोभा यात्रेत मर्दानी खेळ ढोल ताशे, ऐतिहासिक वारसा लाभलेले चलचित्र यासारखे विविध गुण दर्शवणारे कलावंत उपस्थित होते. या शोभायात्रेतील प्रभू श्री रामांची भव्य प्रतिकृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो
फोटो सौजन्न : पुणे टाइम्स मिरर

हे सुद्धा वाचा: 

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

नवनव्या संधींना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी