29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनआरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाच्या आईला पाठवले नोटीस, IVFच्या मदतीने दिला बाळाला जन्म

आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाच्या आईला पाठवले नोटीस, IVFच्या मदतीने दिला बाळाला जन्म

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची (Sidhu Musewala) आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी IVF तंत्राची मदत घेऊन बाळाला जन्म दिला. मात्र, मुलाला जन्म दिला तेव्हापासून एक नवीन वाद सुरु झाला आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकार आणि मूसवाला यांच्या आईकडून उत्तर मागितले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी IVF तंत्राच्या वापराबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. (Notice to Sidhu Musewala's mother for giving birth to a baby with the help of IVF, what is the exact reason?)

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची (Sidhu Musewala) आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी IVF तंत्राची मदत घेऊन बाळाला जन्म दिला. मात्र, मुलाला जन्म दिला तेव्हापासून एक नवीन वाद सुरु झाला आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकार आणि मूसवाला यांच्या आईकडून उत्तर मागितले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी IVF तंत्राच्या वापराबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. (Notice to Sidhu Musewala’s mother for giving birth to a baby with the help of IVF, what is the exact reason?)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत झळकणार सचिन पिळगावकर

आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आणि पंजाब सरकारला दिलेल्या नोटीशीत म्हटलंय की, “सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी (विनियमन) अधिनियम २०२१ धारा अनुसार ART सेवांच्या आधारी आई होणाऱ्या प्रत्येक महिलेची वयोमर्यादा २१ ते ५० निश्चित केली गेलीय. त्यामुळे चरण कौर यांच्या आई होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. यासंबंधित कारवाईची कॉपी लवकरच दिली जाईल.”

एल्विश यादवच्या अटकेवर ईशा मालवीयचं मोठं विधान, हात जोडून म्हणाली- ‘मी सध्या…’

काही दिवसांपुर्वी सिद्धू मुसेवालाचे वडिल बलकौर सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर केला होत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, “नवजात मुलाच्या आगमनानं आम्ही सुखी असताना सरकार या विषयात ढवळाढवळ करत आहे. सरकारची ही कसली भीती?”

सिद्धू मुसेवालाचे वडिलांनी या व्हिडिओ मध्ये म्हटलं की, “वाहेगुरुच्या आशीर्वादाने आमचा शुभदीप काही दिवसांपूर्वी परत आला आहे, मात्र, सरकार मला सकाळपासून त्रास देत आहे. ते मला बाळाची कागदपत्रे देण्यास सांगत आहेत. हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते माझी चौकशी करत आहेत. मला सरकारकडे विनंती करायची आहे, विशेषत: मी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे विनंती करतो की, माझ्या पत्नीचे उपचार पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबा. मी इथलाच आहे, तुम्ही मला जेव्हा कॉल कराल तेव्हा मी तुमच्याकडे चौकशीसाठी येईन आणि मी सर्व कायदेशीर कागदपत्रे देईन फक्त माझ्या पत्नीचा उपचार आधी पूर्ण होऊद्यात.”

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11 लाखांचा मानहानीचा दावा

प्रत्येक देशात आयव्हीएफबाबत वेगवेगळे कायदे आहेत. भारतात याबाबत कायदे करण्यात आले आहेत. 2021 मध्ये IVF च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला. यासंदर्भात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा करण्यात आला. त्यानुसार भारतातील महिला वयाच्या ५० वर्षापर्यंत आयव्हीएफद्वारे बाळाला जन्म देऊ शकतात. पुरुषांमध्ये ते 55 वर्षे आहे. मात्र, सर्व खासगी आयव्हीएफ केंद्रांमध्ये सरकारी नियम पाळले जातात की नाही, हा मोठा प्रश्न आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी