30 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeराजकीय'खरी शिवसेना शिंदेंचीच', मुख्यमंत्रीपद वाचलं, १६ आमदार पात्र ठरल्याने जीवनदान

‘खरी शिवसेना शिंदेंचीच’, मुख्यमंत्रीपद वाचलं, १६ आमदार पात्र ठरल्याने जीवनदान

राज्यात शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाले आहेत. यामध्ये दोन्ही गट शिवसेना ही आमची असल्याचा दावा करत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटावर आमदार अपात्रतेची न्यालयाकडे मागणी केली. अनेक महिन्यांआधी आमदार अपात्रतेसाठी त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली. हाच निकाल अनेक महिन्यांपासून रेंगाळत होता. मात्र (१० जानेवारी) आमदार अपात्रतेबाबत अंतिम निकाल हा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला. यावेळी शिंदे गटाच्या बाजूने हा निकाल लागला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील आणि इतर १६ आमदारांना जीवनदान मिळालं आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

आज राहुल नार्वेकर यांनी निकाल सांगण्यासाठी सुरूवात करण्याआधी विधिमंडळ सचिव यांच्यात बोलणं सुरू असताना राहुल नार्वेकर सेंन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरूवात केली. त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट तसेच वकिलांचे आभार मानले आहेत. नार्वेकर हे वेळेनूसार ४५ मिनिटं उशिरा आले. पण त्यानंतर त्यांनी त्याच्या कामाला सुरूवात केली. त्यांनी एक तास निकाल वाचून दाखवला. त्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी ठळक मुद्दे सांगितले आहेत.

हे ही वाचा

संदीप लामछानेला आठ वर्षांचा तुरूंगवास

लोकशाही मराठी वृत्तवाहीनीवर दडपशाही, चॅनेल ३० दिवसांसाठी राहणार बंद

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

राहुल नार्वेकरांचे ठळक मुद्दे

शिवसेनेची १९९९ ची घटना दुरूस्ती मान्य तर २०१८ ची घटना दुरूस्ती मान्य नाही.

१९ मधील १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर ५ शिवसेना प्रमुखांनी नियुक्त केले.

शिवसेना पक्षप्रमुख हे पद २०१८ साली निर्माण करण्यात आल्याचा दावा.

२०१८ साली पक्षामध्ये केलेला बदल हा शिवसेनेच्या घटनेमध्ये नाही.

नवे नेते निवडण्याचा अधिकार पक्षाला आहे. यामुळे भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध.

मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंना सुरतला भेटले त्यामुळे आमदारांचा संपर्क होऊ शकला नाही.

संपर्काबाहेर गेल्याने त्यांना अपात्र ठरवता येणार नाही.

शिवसेना शिंदेंचीच

खरी शिवसेना ही आता एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं निवडलेला व्हीप हा भरत गोगवले असून हेच अधिकृत व्हिप असल्याचं म्हटलं आहे. यामुळे शिंदे आमदारांना जीवनदान मिळालं असून ते आता पात्र आहेत आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपदही शाबूत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी