25 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजनसत्यशोधक चित्रपट असणार करमुक्त, मंत्रीमंडळामध्ये भुजबळांचा शब्द पाळला

सत्यशोधक चित्रपट असणार करमुक्त, मंत्रीमंडळामध्ये भुजबळांचा शब्द पाळला

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळामध्ये एक मागणी केली. त्या मागणीचे सर्वीकडे कौतुक होत असून मंत्रीमंडळामध्ये छगन भुजबळ यांच्या मागणीला हिरवा कंदील दर्शवला आहे. देशामध्ये स्री शिक्षणाचे बीज रोवणारे, बहुजनांसाठी शि७णाची दारे खुली ठेवणारी पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत. तर पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. यांच्या जीवनावर आधारीत सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. हा निर्णय मंत्रीमंडळामध्ये घेण्यात आला. यामुळे आता मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

सत्यशोधक चित्रपट करसवलतीत मिळणार पाहायला

चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तिकिटासोबत कर भरावा लागतो. मात्र समाजसुधारकांनी आपल्या कार्याची महती देशभर गाजवली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था सध्या भक्कम आणि मजबूत स्थितीत प्रगती पथावर आहे. यामुळे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती ही सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यामुळे छगन भिजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट करमुक्त करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळामध्ये केली. यावेळी त्या मागणीची दखल अजित पवार यांनी घेतली असून त्या मागणीचा पाठपुरावा करत हा सिनेमा करमुक्त केला आहे. एकूण १८ टक्के जीएसटी कर आहे. त्यापैकी ९ टक्के कर हा केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असतो. यामधूनच राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबत निर्ण. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satyashodhak Film (@satyashodhakfilm)

हे ही वाचा

‘आजचा निकाल सर्व जनतेला मान्य असेल’

‘मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?’

मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित, पुरस्कारानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

या घेतलेल्या निर्णयामुळे येत्या भावी पिढीसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य, शिक्षणासाठी लढ, अन्यायाविरूद्ध लढा हा येत्या पिढीपर्यंत पोहोचावा हा मुख्य हेतू आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी साकारली असून महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णा यांनी साकारली आहे. ५ जानेवारी दिवशी हो चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी