29 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeक्रिकेटसंदीप लामछानेला आठ वर्षांचा तुरूंगवास

संदीप लामछानेला आठ वर्षांचा तुरूंगवास

नेपाळचा स्टार क्रिकेटर आणि उत्कृष्ठ गोलंदाज संदीप लामछानेला तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला होता. १७ वर्षीय मुलीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यासाठी त्याला नेपाळमधील न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. यामुळे आता त्याला आठ वर्षे तुरूंगवास भोगावा लागणार आहे. याचसह पीडितेला नुकसान भरपाई देण्यात यावी आणि दंड देण्याचे आदेश दिले आहेत. ही निर्णय शिशीर राज धाकल यांच्या बेंचने दिला. यंदाच्या आयपीेएलमध्ये संदीप दिल्ली संघातून खेळणार होता.

संदीप हा नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होता. त्याच्या खेळाचे केवळ नेपाळपूरतं नाही तर जगभरामध्ये कौतुक केलं जात होतं. सप्टेंबर २०२२ या वर्षामध्ये एका सतरा वर्षीय मुलीने संदीप विरोधात काठमांडू येथील पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. त्यावेळी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. ज्यावेळीस त्याच्यावपर हा आरोप लावण्यात आला तेव्हा संदीप हा कॅरेबियन प्रीमिअर लीग मध्ये (CPL) खेळत होता. त्यावेळी संदीपला आपल्या देशामध्ये पुन्हा यावं लागलं आहे.

हे ही वाचा

लोकशाही मराठी वृत्तवाहीनीवर दडपशाही, चॅनेल ३० दिवसांसाठी राहणार बंद

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

सत्यशोधक चित्रपट असणार करमुक्त, मंत्रीमंडळामध्ये भुजबळांचा शब्द पाळला

संदीपला नेपाळ क्रिकेट असोशिएशनने केलं निलंबित

संदीप विरोधात वॉरंट निघाल्यानंतर त्याच्या कर्णधारपदावर परिणाम झाला त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्याला नेपाळ क्रिकेट बोर्डाने निलंबित केलं. थोडक्यात याचा परिणाम त्याच्या करीअरवर झाला आहे.

आयपीएल खेळणारा पहिला नेपाळ संघाचा खेळाडू संदीप

आयपीएल खेळणारा नेपाळचा खेळाडू म्हणजे संदीप आहे. नेपाळचा एकमेव खेळाडू हा संदीप आहे की जो देशभरातील अनेक टी 20 लीग खेळताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅरेबियन, श्रीलंका आणि इंडीयासह इतरही देशामध्ये त्याने लीग खेळल्या आहेत. अशातच तो एक चांगला फिरकी गोलंदाज असून त्याने २०२८ या वर्षांणध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याच्यासाठी २० लाख रुपये दिल्ली डेयरडेविल्सने मोजले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी