32 C
Mumbai
Thursday, November 24, 2022
घरमनोरंजनRishab Shetty : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन

Rishab Shetty : ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी आहे. याठिकाणी अनेकदा सिनेकलाकार दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे कांतारा स्टार अभिनेता ऋषभ शेट्टी हा सुद्धा येथे दर्शनाला आला. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशासाठी ऋषभ शेट्टीने येथे प्रार्थना केली.

होंबाळे फिल्म्सच्या ‘कांतारा’ ने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीला (Rishab Shetty) देखील दर्शकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. अशातच, ऋषभ शेट्टीने त्याच्या टीमसह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. तसेच, ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीला पाहण्यासाठी दर्शकांची मोठी गर्दी झाली.

ऋषभ शेट्टीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देवस्थळी भेट देताना ऋषभ शेट्टीने पांढरा शर्ट आणि जीन्स असे परिदान केले होते. उत्तर भागातील ‘कांतारा’च्या लोकप्रियतेचे हे स्पष्ट उदाहरण असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दिवसेंदिवस यशस्वी ठरत आहे. अलीकडेच, IMDb द्वारे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘कांतारा’ हा कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम आहे.

हे सुद्धा वाचा

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार ‘बिग बॉस’च्या बाहेर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका का सोडली ?

Star Plus New Serial : स्टार प्लसच्या ‘फालतू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निहारिका चोक्सीने बीसीसीआयच्या निर्णयाचे केले स्वागत

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी आहे. याठिकाणी अनेकदा सिनेकलाकार दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे कांतारा स्टार अभिनेता ऋषभ शेट्टी हा सुद्धा येथे दर्शनाला आला. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशासाठी ऋषभ शेट्टीने येथे प्रार्थना केली. सिद्धविनायचे दर्शन घेतल्यानंतर रिषभ मंदिराच्या बाहेर आला आणि त्याने तिथे असलेल्या प्रसारमाध्यमांना छायाचित्रांसाठी पोझ दिली.

कांतारा या चित्रपटाला ज्याप्रमाणे दक्षिणेतील लोकांकडून प्रेम मिळाले त्याचप्रमाणे हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून सुद्धा या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले आहे, तसेच सर्वच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक देखील केले आहे. याआधी शुक्रवारी ऋषभ शेट्टीने मेगास्टार रजनीकांत यांची त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी भेट घेतली आणि शनिवारी या अभिनेत्याने ट्विटरवर त्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली. फोटोंसोबत त्यांनी लिहिले की, “जरी तुम्ही एकदा आमची स्तुती केलीत तर ते 100 वेळा आमची स्तुती करण्याइतकेच आहे. धन्यवाद. रजनीकांत सर, आमचा चित्रपट पाहिल्याबद्दल आणि आमच्या कांतारा चित्रपटाचे कौतुक केल्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू.”

Rishab Shetty : 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन

लवकरच कांतारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटीपेक्षा अधिक कामे केली. सर्वात कमी कालावधीत कोटींच्या घरात कमाई करणारा कांतारा हा साऊथ मधील आणखी एक चित्रपट ठरला आहे. एका उत्कृष्ट चित्रपटासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींनी परिपूर्ण असलेला कांतारा हा चित्रपट सध्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!