32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमनोरंजन'मै अटल हू', चित्रपटाची सर्वत्र चर्चा

‘मै अटल हू’, चित्रपटाची सर्वत्र चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे आता भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या समोर येऊ घातला आहे. यामुळे आता या चित्रपटामुळे राजकीय रंग प्राप्त होत असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असं वक्तव्य अटल यांनी केलं होतं. मात्र या चित्रपटामध्ये अटलजींच्या लहानपणीचे जीवन ते राजकीय कारकिर्दीबाबत माहिती या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. मै अटल हूं (Main Atal hu) चित्रपटाचं दिग्दर्शन हे मराठी दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलं आहे.

चित्रपटामध्ये नेमकं काय आहे?

मै अटल हूं या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यांच्या बालपणावर झालेले परिणाम आणि त्यांचे राजकीय जीवन, त्यातील चढाओढ याबाबतची माहिती या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. तसेच एक माणूस म्हणून, कवी म्हणून, राजकीय नेते म्हणून अटलजी कसे होते हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.

हे ही वाचा

‘या’ राज्यांमध्ये २२ जानेवारी दिवशी विद्यार्थ्यांना असणार सुट्टी

‘मुलीला सलग आठ वेळा संसंदरत्न मिळाला तरीही कार्यकर्त्यांना संधी दिली’

राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारी दिवशी ‘या’ कार्यालयांना असणार अर्धा दिवस सुट्टी

पंकज त्रिपाठी यांनी केली अटलजींची भूमिका

अटलजींची भूमिका ही अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी केली आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. वाजपेयींची भूमिका करणं पंकज त्रिपाठीसाठी सोपं काम नव्हतं. आव्हानात्मक काम करत असताना पंकज त्रिपाठी यांनी अटलजींची भूमिका साकारत असताना न्याय दिला आहे. अटजींच्या कविता असोत वा अटजींचे प्रसिद्धी झोतात आलेली भाषणं असो या सर्व बाबींचा अभ्यास पंकज त्रिपाठी यांनी केला आहे.

थोडसं दिग्दर्शनाबाबत

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. टिझर पाहिल्यानंतर लक्षात येतं की सिनेमाची दृश्य अटलजींचा काळ उभा करणारा आहे. ध्वनी, चित्रपटाचे संगीत अफलातून आहेत. यामुळे एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांनी आपली ओळख या चित्रपटातून अबाधित ठेवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी