राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यावरून आता सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टीप्पणी करत आहेत. अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. आता या राजकारणामुळे घरातील नातेसंबंधांवर वाईट परिणाम पाहायला मिळत आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये सध्या चांगलीच चुरस रंगली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंमध्ये राजकीय पात्रता असूनही आठ वेळा संसंदरत्न मिळवला असं असताना सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचं वक्तव्य केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी अजित पवार गटावरही टीका केली. ते बारामतीमध्ये गेले असताना बोलत होते.
शरद पवार आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तशी टीकेची तोफा डागलेल्या पाहायला मिळत आहेत. अशातच शरद पवार हे बारामतीमध्ये गेले असताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत आणि अजित पवार गटवर टीका केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना आठ वेळा संसंदरत्न मिळाला. त्यांच्यामध्ये पात्रता असूनही कार्यकर्त्यांना संधी दिली. लोक मला अनेकदा म्हणायचे की, सुप्रिया सुळे तीनदा निवडूण आल्या त्यांना संधी द्या. पण मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचं ते म्हणाले.
हे ही वाचा
‘या’ राज्यांमध्ये २२ जानेवारी दिवशी विद्यार्थ्यांना असणार सुट्टी
राजू शेट्टी म्हणतात अनेक ऑफर आल्या तरीही मी हुरळून जाणारा नाही
अजित पवार गटावर टीका
शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटामध्ये काही दिवसांपासून टीकेचे युद्ध पाहायला मिळत आहे. बारामतीत बोलत असताना शरद पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. ‘काहीजण सोडून गेले. ज्या चिन्हावर लढले आता तेच भाजपसोबत गेले आहेत. काहीजण भीतीपोटी गेले आहेत. तर काहीजण पदापोटी गेले आहेत. तर काहीजण हे सत्तेपोटी गेले’, असल्याचं शरद पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
‘मुलीला बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली’
‘सुप्रिया सुळे या तब्बल आठ वेळा संसदरत्न विजेत्या आहेत. त्यांच्यामध्ये चांगली पात्रता आहे. अनेकदा मला लोकांनी विचारलं देखील की सुप्रिया सुळे तीनदा निवडूण आल्या आहेत. त्यांना संधी द्या पण मी मुलीला बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे’.
‘लोकशाहीमध्ये एक पक्ष असल्यास हुकुमशाही असते’
‘लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असतो. मात्र हुकुमशाहीमध्ये हिटलरचा एकच पक्ष असतो. आपल्याला हूकुमशाहीचा पक्ष नको. आपल्याला लोकांसाठी पक्ष पाहिजे.’