29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीय'या' राज्यांमध्ये २२ जानेवारी दिवशी विद्यार्थ्यांना असणार सुट्टी

‘या’ राज्यांमध्ये २२ जानेवारी दिवशी विद्यार्थ्यांना असणार सुट्टी

२२ जानेवारी दिवशी संपूर्ण देशामध्ये श्रीरामलल्लाच्या (Lord Shree ram) प्राणप्रतिष्ठेचा मोठा उत्सव साजरा होत आहे. यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा देशवासीयांचा उत्साह आणि आनंद गगणामध्ये मावेनासा होत आहे. यामुळे या दिवशी सरकारी नोकरदार वर्गाला अर्धी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर देशातील काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान या दिवशी ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये दारूची दुकानं बंद राहतील असा निर्णय मोदी आणि योगी सरकारने दिला आहे. (Aayodhya)

अनेक दिवसांपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वच देशवासी अतुर झाले आहेत. रामलल्लाच्या मंदिराचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक देशभरातून मान्यवर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांनी २२ जानेवारी दिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करा. घराभोवती दिवे लावा रांगाेळी काढून उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. अशातच सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

हे ही वाचा

राजन साळवींच्या अडचणीत वाढ

राजू शेट्टी म्हणतात अनेक ऑफर आल्या तरीही मी हुरळून जाणारा नाही

प्रकाश आंबेडकरांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेस जाण्यास दिला नकार, कारण आलं समोर

‘या’ राज्यांमध्ये शाळा महाविद्यालयांना असणार सुट्टी

उत्तरप्रदेश, हरयाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांआधी शाळांना सुट्टी देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. रामाची जन्मभूमी ही आयोध्या आहे. आयोध्या हे उत्तरप्रदेश राज्यामध्ये आहे.

हरयाणा

२२ जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त हरयाणा सरकारने राज्यातील शाळांना सुट्टी दिली आहे. या दिवशी राज्यातील दारूची दुकानं बंद राहणार आहेत.

छत्तीसगड

२२ जानेवारी दिवशी शाळा आणि महाविद्यालयं बंद राहणार आहे. राज्यसरकारने याआधी मार्गदर्शन तत्वे जारी केले आहे.

मध्यप्रदेश

२२ जानेवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. अशातच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं होत. तसेच या दिवसी ड्राय डे असणार आहे.

गोवा

गोवा सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी असणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी