32 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयखासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूरला दिली जीवे मारण्याची सुपारी :...

खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूरला दिली जीवे मारण्याची सुपारी : संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. मात्र, या आरोपाचा एकनाथ शिंदे गटाने इन्कार केला आहे. (MP Shrikant Shinde gave contract to kill me says Sanjay Raut) ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला मला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना ही बाब आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचे राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले आहे.

मागील काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींना धमक्या देण्यात येत आहेत. (Threats to Representatives) राजकीय व्यक्तींवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर माझी सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे संजय राऊत यांनी या पत्रात नमूद केले आहे. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण येणार आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळातही दहशतीचे वातावरण पसरले आहे. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. त्याबाबत आपण सक्षम असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

घोडेबाजार : आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी ७५ कोटी ; संजय राऊतांचे ‘रेट कार्ड’

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शिवसेनेचे ट्विटर अकाऊंट, अधिकृत वेबसाईटला लागले ग्रहण!

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी