29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमनोरंजनसलमान खानच्या निवासाबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक

सलमान खानच्या निवासाबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक

अभिनेता सलमान खानच्या (Actor Salman Khan) वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केलीये. या आरोपींना मंगळवारी गुजरातच्या भुज जिल्ह्यातून (Bhuj Gujarat) पकडण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Crime Branch) दिली. गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही व्यक्तींना गुजरातमधील भुज शहरात अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे. ( Salman Khan Firing Outside Residence Updates )

सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेनं दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही गोळीबाराची घटना घडली, तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात दोन अज्ञातांविरोधात कलम 307 अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात सलमान खानच्या सुरक्षारक्षकानं दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

2022 च्या मे महिन्यात पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आली होती. सलमान आणि तुमचा लवकरच मुसेवाला होणार. अशी धमकी चिठ्ठीतून देण्यात आली होती. सलमान खानच्या वडिलांनी हे धमकीच्या पत्राबाबत पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुसेवालाच्या हत्येनतंर सलमान खानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली होती. याचं कारण म्हणजे मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आलं होतं. काही वर्षापूर्वी लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी