31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात अंगाला घामाचा वास येतोय? फॉलो करा 'या' टिप्स

उन्हाळ्यात अंगाला घामाचा वास येतोय? फॉलो करा ‘या’ टिप्स

उन्हाळा (Summer) सुरू झाला की, आरोग्याच्या काही समस्या नव्याने सुरू होतात. उष्णता, घाम, चिकटपणामुळं आपल्याला अस्वच्छ वाटू लागतं. नोकरी-व्यवसाय कामासाठी उन्हात घराबाहेर राहिल्यानंतर अनेकांना यादिवसात अंगातून घामाचा वास येऊ लागतो. त्यामुळं अस्वस्थ वाटू लागतं. मित्रपरिवारात वावरताना अवघडल्यासारखं होत.(summer season how to reduce the smell of sweat)

उन्हाळ्यात शरीराला घाम येणं सहाजिक आहे अन् त्याचा दुर्गंध आला तर ते स्वतःसह इतरांनाही त्रासदायक ठरतं. त्यामुळे महागडे परफ्यूम्स, डिओड्रेंट वापरण्यास अनेकजण पसंती देतात. तरी देखील घामाचा वास हा येतोच. तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवा.

आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस किंवा त्याच्या पानांची पावडर आंघोळीच्या पाण्यात मिसळा. असं केल्याने शरीरातून येणाऱ्या घामाची दुर्गंधी दूर होते.

कडुलिंब पाण्यात टाकुन पाणी गरम करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे घामाचा वास येणार नाही.

पुदीनाची पाने पाण्यात मिसळून ते पाणी गरम करून घ्यावं. हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा, याने अंघोळ केल्याने घामाच्या वासापासून सुटका मिळते.

आंघोळ झाल्यानंतर तीन किंवा चार मिनीटांनी शरीराच्या ज्या भागात घाम येतो अशा भागात तुरटी फिरवा. त्यामुळे शरीरावरील बॅक्टेरिया नष्ट होतात.

उन्हाळ्यात नेहमीच हवेशीर कपडे निवडा. जसे की कॉटन. हवेशीर कपड्यांमुळे हवा खेळती राहते आणि घाम साचणं कमी होतं. पॉलिस्टर किंवा नायलॉनसारखे सिंथेटीक मटेरियल्स टाळा. यामुळे मॉईश्चर आणि हिट ट्रॅप होते आणि त्याचा आपल्याला अधिक त्रास होतो.

अंघोळ केल्यानंतर किंवा पोहल्यानंतर स्वतःला पूर्णपणे कोरडं करा. आपल्या शरीरावरचा अतिरिक्त ओलावा शोषण्यासाठी टॅल्कम पावडर किंवा कॉर्नस्टार्च वापरा.

लसूण, कांदे आणि मसाल्यांसारखे काही पदार्थ शरीराला दुर्गंधी आणू शकतात. या पदार्थांचे उन्हाळ्यात सेवन करणं टाळा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी