26 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरमनोरंजनSalman Khan : सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटात दिसणार अभिनेत्री रिद्धी डोगरा

Salman Khan : सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री रिद्धी डोगरा

सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित 'टायगर 3'चे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, रिद्धी डोगरा 'टायगर 3'मध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित ‘टायगर 3’चे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतानाच, नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, रिद्धी डोगरा ‘टायगर 3’मध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रॉडक्शन युनिटच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला की, “सलमानने अलीकडेच दिवाळी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केल्यानंतर, मनीष शर्माच्या ‘टायगर 3’ बद्दल खूप उत्साह आहे.

‘टायगर 3’ ची कास्टिंग खूप मजबूत आहे. सलमान-कतरिना पुन्हा एकत्र दिसणार आहेत. तसेच, इमरान हाश्मी या चित्रपटात सामील होण्याव्यतिरिक्त, ‘टायगर 3’च्या कलाकारांमध्ये टेलिव्हिजनमधील लोकप्रिय चेहरा रिद्धी डोगरा देखील असेल. तिने पूर्वी टेलिव्हिजन तसेच ओटीटीवर काही उत्कृष्ट काम केले आहे, त्यात नवीनतम असुर आहे. तिच्या पात्राचे तपशील उघड झाले नसले तरी, सलमान खान अभिनित चित्रपटात ती एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि टीम आता पुढच्या वर्षी रिलीजसाठी तयारी करत आहे.”

हे सुद्धा वाचा

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

Mumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप

रिद्धी डोग्रा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने ‘असुर: वेलकम टू युवर डार्क साइड’ आणि ‘द मॅरीड वुमन’या वेब सीरिजमध्ये अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय, तिने काही लोकप्रिय डेली सोप्समध्ये काम केले असून, रिअलिटी शोमध्येही तिचा सहभाग होता. तसेच, ‘टायगर 3’मध्ये तिची भूमिका असल्याचे निश्चित झाले असून, या अ‍ॅक्शन स्पाय चित्रपटात तिला सशक्त भूमिका साकारताना पाहणे रोमांचक असेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!