32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमुंबईनेरूळमध्ये रूग्णवाहिकेतून खेचून तरूणावर चाकूने सपासप वार

नेरूळमध्ये रूग्णवाहिकेतून खेचून तरूणावर चाकूने सपासप वार

नवी मुंबईतील नेरुळमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ३० वर्षीय रुग्णवाहिका मदतनासवर चाकूने हल्ला केला असून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं नेरूळ शहर हादरलं आहे. यामुळे नेरुळमध्ये झालेल्या या कृत्याने हळहळ व्यक्त केली जात असून सर्विकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नेरूळ पोलिसांनी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव हे युवराज अमरेंद्र सिंह आहे. रुग्णवाहिकेवर मदतनीस तर वेळप्रसंगी ड्रायव्हरचं काम करायचा.

नेरूळ येथील डीवाय पाटील येथे ही घटना घडली आहे. डीवाय पाटीलजवळ रुग्णवाहिका पार्क केलेल्या असतात. या ठिकाणी नारळपाणी विकणारे फेरीवाले आपापले काम करत असतात. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो  युवराजने काढल्याने युवराजची हात्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. हॉस्पिटलबाहेर गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी भुर्जी पाव विक्रेत्याला नारळपाणी विक्रेत्या महिलेला त्या ठिकाणाहून हकलवायचे होते. यावेळी भुर्जी पाव विक्रेत्याने महिलेचे नारळ पाणी चोरले होते. यावेळी युवराजने काही फोटो काढले होते आणि ते नारळ पाणी विकणाऱ्या महिलेला दाखवले. यावरून भुर्जी पाव विकणाऱ्या युवकाच्या मनात अनेक दिवसांपासून राग होता. यावेळी त्याने आपल्या काही साथीदारांना घेऊन युवराजला संपवले.

हे ही वाचा

‘व्यसनमुक्तीसाठी सेवाभावींचा हात’

ओबीसीच्या लढ्याचा जनक मीच; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर नाकाडे यांनी हॉस्पिटलजवळ रुग्णवाहिका पार्क केली होती. यावेळी चार अज्ञातांनी युवराज वर हल्ला केला. त्यातील एकाने युवराजला बेछुटपणे मारले तर दुसऱ्याने खेचून बाहेर काढले असून रुग्णवाहिकेची नासधूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी चालकाने तशाच स्थितीत रुग्णवाहिका पुढे नेली. अशा स्थितीतही युवराजला चौघांनी बाहेर काढून बेदम मारहाण केली. एकाने मानेवर चाकूने वार केले. यावेळी गाडी चालकाने रुग्णवाहिका मालकाला खबर दिली. त्यांनी त्या चार मुलांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी त्यांनी युवराजला रुग्णालयात दाखल केलं. मात्र यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

युवराजची हत्या केलेल्या गुन्हेगारांचे नाव हे अमजद रियाज खान वय (४५), समीर अमजद खान वय (२४), शोऐब अमजद खान, (२२ वर्षे) या आरोपींना (२७ नोव्हेंबर) रोजी रात्री ९.३८ वाजता अटक करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी