32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'तुम्ही गोट्या खेळत होता का'?

‘तुम्ही गोट्या खेळत होता का’?

राज्यात मराठा आरक्षणाला वेगळं वळण लागलं आहे. काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी सरकारवर आक्रमक होत आहे. या स्थितीत काही नेते राजकारण करत असल्याच्या टीका करत आहेत. आज सत्तेत असलेले नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून चार हात लांब आहेत. तर काही वर्षांआधीचे सत्ताधारी आमची सत्ता असती तर आरक्षण दिलं असल्याचं बोलत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ साली राष्ट्रवादीमुळे आम्ही विजयी न झाल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर देत पृथ्वीराज चव्हाणांना चांगलेच सुनावले आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

पृथ्वीराज चव्हाणांनी आमची सत्ता असती तर आम्ही आरक्षण दिले असते, असे वक्तव्य केलं आहे. यावर  पलटवार करत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी तुम्ही इतक्या वर्षे झोपलेलात का? गोट्या खेळत होता का? तुम्ही मख्यमंत्री होता ना, गेली चाळीस वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, शिंदे सरकारच्या धास्तीमुळे आता हे पोपट बोलायला लागले आहेत, अशी बोचरी टीका संजय शिरसाटांनी  केली आहे.

हे ही वाचा

नेरूळमध्ये रूग्णवाहिकेतून खेचून तरूणावर चाकूने सपासप वार

‘व्यसनमुक्तीसाठी सेवाभावींचा हात’

ओबीसीच्या लढ्याचा जनक मीच; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

२०१४ ला आमचे सरकार राष्ट्रवादीमुळे पडले आहे. आमचे सरकार असते तर मराठा समाजाल आम्हीच आरक्षण दिले असते. माझी खात्री आहे की आमचं सरकार जर पडलं नसतं तर एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो. आणि आता भाजपऐवजी आमचे सरकार असते, असे पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं आहे. यानंतर शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना देखील टार्गेट केलं आहे.

उद्धव ठाकरेंना टार्गेट

शेतकऱ्यांच्या पंचनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांची लाज काढणारे अडीच वर्षे घरात बसत आहेत. हे मोठे दुर्दैव आणि मोठा विनोद आहे. अवकाळी पाऊस येणार म्हणजे छत्री धरायची होती का? यांना शेतातलं काही कळतं का? असा सवाल आता शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, तर काही मंत्री बांधावर गेले आहेत. यांना ना आरक्षण आणि कशाचे देणं घेणं नाही, फक्त घरात बसायला हवं अशी खोचक टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी