30 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमनोरंजनमराठमोळा शिव घेणार 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दमदार एंट्री

मराठमोळा शिव घेणार ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये दमदार एंट्री

खतरों के खिलाडी सीझन 13 शोमध्ये शिव ठाकरें सोबत रुही चतुर्वेदी आणि अंजुम फकीह यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. हा कार्यक्रम जून महिन्यात प्रसारित होणार आहे.

बिग बॉस 16 शोनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला मराठमोळा शिव ठाकरे आता गगन भरारी घेताना दिसून येत आहे. बिग बॉसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर शिव आता खतरों के खिलाडीमध्ये भयानक स्टन्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र शिव याची चर्चा रंगत आहे. कधी तो उंचावरून लटकताना दिसणार आहे तर कधी साप आणि मगरी यांच्यामध्ये स्टंट करणार आहे. हा कार्यक्रम आहे रोहित शेट्टीचा लोकप्रिय शो खतरों के खिलाडी. बिग बॉसनंतर चाहते या कार्यक्रमात शिवला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या खतरों के खिलाडी या शोच्या माध्यमातून शिव चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘बिग बॉस 16’च्या घरात सर्वांना समजून घेणारा प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला शिव आता वेगळ्या रुपात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. बिग बॉसनंतर आता खतरों के खिलाडी या रिअलिटी शोमध्ये शिवला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र शिव ठाकरे याचीच चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरे खतरों के खिलाडी 13 सीझनचा पहिला स्पर्धक असणार आहे.

दरम्यान, खतरों के खिलाडी 13 या कार्यक्रमाचं प्रक्षेपण व्हायला अजून वेळ आहे, पण त्याआधीच यात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. परंतु, या शोसाठी शिवचं नाव निश्चित झालं आहे. या शोसाठी तो स्वत:ला तयार करत असल्याचंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तो पोहायला शिकत आहे, फिजिकल ट्रेनिंग घेत आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शिव खतरों के खिलाडी 13 च्या प्रत्येक एपिसोडसाठी 5 ते 8 लाख रुपये घेत आहे. म्हणजे एका आठवड्याला तो 10 ते 16 लाख रुपये कमावण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बिग बॉसमधून बाहेर पडताच त्याने एक लक्झरी गाडी खरेदी केली होती. त्यासोबतच त्याने स्वतःचं एक हॉटेलही सुरू केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

हे सुद्धा वाचा: 

Bigg Boss 16 Finale: इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस विजत्याला मिळणार मोठी संधी!

Bigg Boss Hindi : काँग्रेस नेत्याने उचलला मराठमोळ्या शिव ठाकरेवर हात !

एलॉन मस्कचा धंदा म्हणजे धंदा; पैसे न भरल्याने अमित शाह,अमिताभ, सलमान, विराट ब्ल्यू टिकविना

Shiv Thakare, Khatron Ke Khiladi 13, Khatron Ke Khiladi, Reality Show, Bigg Boss, Rohit Shetty, MC STAN

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी