35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजएलॉन मस्कचा धंदा म्हणजे धंदा; पैसे न भरल्याने अमित शाह,अमिताभ, सलमान, विराट...

एलॉन मस्कचा धंदा म्हणजे धंदा; पैसे न भरल्याने अमित शाह,अमिताभ, सलमान, विराट ब्ल्यू टिकविना

"ट्विटर"वर फुकटातली VIP मिरवामिरवी झाली बंद

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अधिग्रहीत केल्यावर एलॉन मस्क अनेकदा चर्चेत आले. ट्विटरची धुरा सांभाळताच त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे वापरकर्त्यांना बुचकळ्यात टाकले होते. दरम्यान ट्विटरसाठी ब्ल्यू टिक हवी असेल तर पेड सर्व्हिस घ्यावी लागणार असल्याचं मस्कने म्हटलं. जे लोक पैसे मोजतील त्यांनाच ब्ल्यू टिक मिळेल. कुणालाही ब्ल्यू टिक मोफत मिळणार नाही, असं मस्क यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजपासून कुणालाही ट्विटरवर फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही. ट्विटरने रात्री 12 वाजल्यापासून जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे.

ट्विटर खरेदी करण्यासाठी मस्कने प्रचंड पैसा खर्च केला आहे. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांचा हा धाडसी प्रयत्न सुरू आहे, असे खूप जणांचे म्हणणे आहे. बऱ्याच काळापासून ट्विटर नफ्यात नाहीये. त्यामुळेच नवा निर्णय घेऊन त्यांनी पैसा वसूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी आहे किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची आहे त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होतं. मोबाईल यूजर्ससाटी दर महिन्याला 900 रुपये भरावे लागणार आहेत. ट्विटरने भारतासहीत या आधीच अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पेड सर्व्हिस सुरू केली आहे. या देशांमधील नागरिकांनी ट्विटरची पेड सर्व्हिस घेण्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे.

यांचे ब्ल्यू टिक हटले
भारतात अनेकांची ब्ल्यू टिक हटवण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रिमो मायावती, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप आमदार नितेश राणे, क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार आदींची ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:

ट्विटरची नवी चिमणी पाहिलीत का?

ट्विटर अडचणीत ; एलॉन मस्क यांनी नोकरकपात केल्यानंतर ‘किड्याची’ घुसखोरी

भारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

Twitter blue tick has been removed from Indian celebrities, twitter blue tick subscription chargers, Twitter, Elon Musk, Twitter blue tick, Elon Musk’s Twitter business; Amit Shah, Amitabh, Salman, Virat without blue tick

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी