33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला राज्यामध्ये शाळांना सुट्टी

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला राज्यामध्ये शाळांना सुट्टी

२२ जानेवारी दिवशी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशवासीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. या दिवशी अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. २२ जानेवारी दिवशी आयोध्येमध्ये मंदिराचा उद्घाटन सोहळा असणार असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी करण्यास सांगितली आहे. आपल्या दाराभोवती दिव्यांची रोषणाई करा आणि दिवाळी साजरी करा असं सांगितलं आहे. यामुळे आता राम भक्त या दिवसाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र हा दिवस आता लवकरच येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी शिंदे सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालायांना सुट्टी जाहीर केली असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशातच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा आणि छत्तीसगडमध्ये ड्राय डे साजरा करण्यात येणार आहे. म्हणजेच या दिवशी काही राज्यांमध्ये दारू विकली जाणार नाही.

हे ही वाचा

‘वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा’, रत्नागिरीत राजन साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

२४ जानेवारी दिवशी रोहित पवारांची ईडीकडून चौकशी होणार

‘मुलीला सलग आठ वेळा संसंदरत्न मिळाला तरीही कार्यकर्त्यांना संधी दिली’

मंगलप्रताप लोढा यांच्या मागणीला यश

२२ जानेवारीला आयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन आहे. यामुळे इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यामुळे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबद्दल पत्र लिहिलं आहे. या पत्राची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

दरम्यान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून अनेक मान्यवर आपली उपस्थिती दाखवणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्राणप्रतिष्ठेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशातून अनेकांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

बॉलिवूडमधील कलाकार, रामायणामध्ये राम आणि सीतेची भूमिका निभावलेल्या कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. उद्योजक, खेळाडू आणि विरोधक नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान राम मंदिराचा वापर अनेकदा आपल्या राजकीय कारणासाठी केला जात असल्याचं अनेकदा विरोधकांनी दावा केला आहे. यामुळे आता राम मंदिराचा मुद्दा अनेकदा टर्न आणि ट्विस्ट घेताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी