29 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा', रत्नागिरीत राजन साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

‘वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा’, रत्नागिरीत राजन साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सत्ता संघर्षामुळे वाद होताना दिसत आहेत. तर सत्ताधारी विरोधकांवर ईडीचा वापर करून पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचं चित्र गेली दोन वर्षांपासून सऱ्हास पाहायला मिळत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकदा विरोधकांवर ईडीचा वापर करत पक्ष फोडण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. आता अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची २४ जानेवारी दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते राजन साळवी यांच्या घरावर गुरूवारी एसीबीनं धाड टाकली आहे. यामुळे राजन साळवींच्या समर्थनार्थ अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर रत्नागिरीमध्ये राजन साळवींच्या नावाने बॅनरबाजी केली.

रत्नागिरीमध्ये साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

गुरूवारी राजन साळवी यांच्या घरावर एसीबीनं धाड टाकली. सकाळी ९ वाजल्यापासून तपासणी सुरू होती ते रात्री ७ पर्यंत तपासणी बंद करण्यात आली. त्यानंतर त्यांना मध्यवर्ती बॅंकेत उर्वरित कागदपत्र तपाण्यासाठी रवाना करण्यात आलं. त्यानंतर राजन साळवींच्या घराबाहेर अनेक कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. यावेळी कार्यकर्ते आक्रमक दिसत होते. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी साळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. ‘वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा’, असा आशय साळवींच्या बॅनरवर पाहायला मिळाला आहे.

हे ही वाचा

२४ जानेवारी दिवशी रोहित पवारांची ईडीकडून चौकशी होणार

महाराष्ट्र ‘राज्य सरकारने केलेल्या सामंजस्य करारामधील उद्योग गुजरातला जाणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी’

‘मै अटल हू’, चित्रपटाची सर्वत्र चर्चा

राजन साळवी यांच्यावर एसीबीनं धाड टाकली आहे. याचा तपास आता गुरूवारी आठ तास सुरू होता. यावरून आता राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये जाण्यापेक्षा पोलिस कोठडीमध्ये जाईल. सध्या सुरू असलेला तपास हा राजकीय सुडबुद्धीने होत असल्याचं  शिवसैनिकांचं म्हणणं आहे. अशातच साळवी हे आतापर्यंत अलिबाग येथे एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल पाच ते सहा वेळा चौकशीसाठी गेले असल्याचं बोललं जात आहे.

कुटुंबाला त्रास देण्याचा उद्देश

रत्नागिरीमध्ये राजान साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, ‘कुटुंबाला त्रास देण्याचा हेतू आहे. याआधी माझ्या कुटुंबाची अनेकदा चौकशी केली आहे. एकूण ७० नोटीसा आल्या आहेत. माझी पत्नी, माझा मुलगा, माझा भाऊ आणि माझी वहिनी यांची देखील याआधी चौकशी करण्यात आली आहे’, असं राजन साळवी म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी