28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमनोरंजनसनी देओल मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत फिरतोय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत फिरतोय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मनोरंजन, चित्रपट क्षेत्रात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. या क्षेत्रात दररोज नवनवीन काहीना काही घडतच असतं. याची आतुरता चाहत्यांना असतेच. हल्ली डिजिटलचा जमाना आणि त्यातही सोशल मीडियावर करोडो चाहते असतात. यांचे लक्ष चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेता अभिनेत्रींकडे अधिक असते. अनेकदा काही नेटीजन्स हे अभिनेता आणि अभिनेत्रींवर चांगल्या वाईट अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद (sunny Deol Drunks) अवस्थेत फिरत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर आता चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हल्ली एखादा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. कारण सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. यामुळे क्षणार्धात घडलेल्या घटना काही मिनिटांमध्येच कानी लागतात. अशातच आता सनी देओल मध्यधुंद अवस्थेत मुंबईतील जुहू भागात फिरत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला, यावर चाहत्यांनी डिपफेक व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया दिली, तर सनी पाजी मध्यधुंद अवस्थेत का फिरत आहेत? असा सवाल विचारला आहे. तर बॉबीच्या यशाचा सदमा असेल अशी खिल्ला वजा प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आता समोर आलं आहे.

हे ही वाचा

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्यात ढेरीवरून कोपरखळ्या

चेन्नईत मिचाँग चक्रीवादळाने पूर; जिकडं तिकडं पाणीच पाणी

‘विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी’

व्हिडिओमागचं सत्य

व्हिडिओमध्ये सनी देओल मध्यधुंह स्थितीत फिरत आहे. ‘सफर’ नावाच्या चित्रपटाचं सध्या चित्रिकरण सुरू आहे, या चित्रपटात तो वेगवेगळ्या शहरात जात असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्या चित्रिकरणादरम्यानचा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

एका मुलाखतीत सनी देओलने मद्यपान करत नसल्याचे सांगितले होते. इंग्लंडला असताना औपचारीकता म्हणून मी काही वेळा दारू प्यायली आहे. मात्र ती इतकी कडू असते. तिचा दुर्गंध येतो आणि डोकं दुखायला लागतं. लोकांना हे इतकं कसं आवडतं माहित नाही, अशी माहिती देत व्हिडिओमागचं सत्य सनी देओलने सांगितलं आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी