33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीय'महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत'

‘महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत’

राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक असून आंदोलन करत आहे. त्याचप्रमाणे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केलं आहे. (६ डिसेंबर) दिवशी मराठा समाजाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अशा स्थितीत ओबीसी सामाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजच शिल्लक राहणार नाही सर्वच ओबीसी होतील कुणबी होतील, यामुळे आता कोणत्याही उपायांची गरज आहे असे मला वाटत नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

काय म्हणाले भुजबळ?

अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसी प्रर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. जर सर्वांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मराठा समाज शिल्लक राहणार नाही. सर्वच मराठा समाज कुणबी होतील, सर्वच मराठा जर कुणबी होणार असतील तर क्युरेटिव्ह पिटिशन करा पण बाहेर कोण राहिल? असा सवाल आता भुजबळांना पडला आहे. आयोगीतील अनेक लोकं बाहेर पडू लागली आहेत. हा ओबीसींचा आयोग नाही तर हा मराठा समाजाचा आयोग असल्याचं भुजबळ म्हणाले आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे बोलताना नेहमीच माझ्याविरोधात बोलत असतो. कारण माझ्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही. भुजबळ इथपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी हरिभाऊ राठोड ओबीसी समाजात फूट पाडण्याचं काम करत असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही वाचा

सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत फिरतोय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्यात ढेरीवरून कोपरखळ्या

चेन्नईत मिचाँग चक्रीवादळाने पूर; जिकडं तिकडं पाणीच पाणी

दादागिरी करत कुणबी प्रमाणपत्र घेतली जात आहेत. पुढे जात पडताळणी करताना हेच होणार आहे. दादागिरी करतच प्रमाणपत्र घेतलं जाणार आहे. आता ओबीसींवर चर्चा करून काय करणार? आता सर्वच मराठा ओबीसी आहेत. महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत, आता सगळेच मराठा ओबीसी होणार आहेत. मात्र यावर कोणीतरी मनोज जरांगेंना उंचीवर घेऊन जात आहे, नेमकं त्याप्रमाणे होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी