असं म्हणतात की, या जगात लक्ष्मी आणि कुबेर सोडले तर सगळ्यांचा कधी ना कधी पैशांची गरज पडते. प्रत्येकालाच आर्थिक तंगीचा सामना हा करावाच लागतो. मग यात लहान मोठे उद्योगपती, व्यावसायिक लोकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वच सामील असतात. अशा वेळेस कलाकार तरी कसे अपवाद असणार. ग्लॅमर जगात वावरतात म्हणून त्यांना खूप पैसे मिळतात असे होत नाही. कलाकारांना देखील पैशांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेच काहीसे झाले आहे, मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सुप्रिया पाठारे यांच्या बाबतीत. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिकांमधून प्रेक्षकांवर आपली छाप पडणाऱ्या सुप्रिया यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्यात सध्या सुरु असलेल्या अनेक अडचणींबद्दल भाष्य केले आहे.
अभिनेत्री सुप्रिया यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाच्या माध्यमातून आपली एक मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स देखील भरपूर आहेत. सुप्रिया यांचा मुलगा एक उत्तम शेफ असून, तो अभिनयापासून दूर स्वतःचा एक व्यवसाय करत होता. त्याने पावभाजीची एक गाडी सुरु केली होती. याबद्दल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलगा मिहीर कमालीचा प्रकाशझोतात आला. काही महिन्यांपूर्वीच सुप्रिया यांच्या मुलाने ठाण्यामध्ये ‘महाराज’ नावाचे एक हॉटेल सुरु केले. मात्र हॉटेल सुरु झाल्यानंतर काही काळातच ते दोन वेळा बंद झाले आणि पुन्हा सुरु झाले. मात्र ‘महाराज’ बंद पडल्याच्या अनेक बातम्या पसरवल्या गेल्या. त्यामुळे याबद्दल आता सुप्रिया पाठारे यांनी स्वतः सर्व माहिती दिली आहे.
View this post on Instagram
सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी आणि मिहीरने ऑगस्ट २०२३ मध्ये ‘महाराजा हॉटेल’ सुरू केले. हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. सगळे काही सुरळीत चालू होते. मात्र अचानक आमच्या या हॉटेलवर संकटांची मालिका सुरु झाली. माझी आई कॅन्सरमुळे गेली. त्यानंतर अचानकच आमच्या हॉटेलचा स्टाफ पळून गेला. त्या धक्क्यातून सावरतो तर मिहिराला हॉटेलमध्ये काम करताना मोठ्या प्रमाणावर भाजले गेले. एकीकडे माझे शूटिंग सांभाळून मी हॉटेलमध्ये काम करत होती. मात्र नाइलाज झाल्याने आम्ही तेव्हा हॉटेल बंद केले. आम्ही मोठ्या तोट्यात गेलो खूप नुकसान झाले.”
हे ही वाचा
अमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, कोर्ट मॅरेज करत दिली माहिती
पुढे सुप्रिया यांनी सांगितले की, “आम्हाला पुन्हा हॉटेल सुरु करायचे होते, मात्र पैसा उभा करणे अवघड होते. यासाठी मग मी कोणाकडे पैसे न घेता माझे स्वतःचे काही दागिने विकले. या सर्व घटनांमध्ये अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार माझ्या पाठीशी अतिशय खंबीर उभे होते, म्हणूनच मी या काळात तग धरू शकली.” सुप्रिया यांनी या मुलाखतीदरम्यान अनेक लोकांना जे आता नवीन हॉटेल सुरु करण्याच्या विचारत आहे, त्यांना अनेक सल्ले देखील दिले.
दरम्यान आता सुप्रिया आणि मिहीर यांचे ‘महाराज’ हॉटेल पुन्हा सुरु झाले असून, लोकांनी पुन्हा एकदा त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.