30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

अनेकदा खानपानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप तसेच टीक टिप्पणी केली जात होती. अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना केवळ खानपानावर किती पैसे खर्च करता असं अनेकदा विचारण्यात आलं. मात्र अनेकदा सत्ताधारी याला उलट उत्तर देत प्रकरणाला वळवण्याचं काम करतात. मागे मंत्रीमंडळामध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चहात काय सोन्याचं पाणी टाकून पिता का? असा सवाल खानपानाच्या खर्चाबाबत विचारला असता, शिंदेनी प्रश्नाला मजेशिर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की ‘माझ्याकडे सोन्यासारखी लोकं येतात’, असं म्हणत यामधील खरी माहिती अजूनही समोर आली नाही. अशातच आता अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्याने आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या खानपानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर खानपनासाठी सध्या साडे तीन कोटी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दिड कोटी आणि अजित पवार यांच्या बंगल्यावर दिड कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर अनेक पाहुण्याच्या खानपानासाठी सरकार किती कोटी रूपये खर्च करतं ही माहिती आता समोर आली आहे. राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यावर मंत्रालयामध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये अधिक गर्दी व्हायची. याचा सरकारच्या तिजोरीवर अधिक परिणाम होत होता. आरटीआयच्या माहितीनुसार सरकार आल्यानंतर या चार महिन्यामध्ये २ कोटी ३८ लाख रूपये खर्च करण्यात आले.

हे ही वाचा

‘आव्हाड समोर आले तर वध करणार’

‘राम सिया राम…’ गाण्यावर विराट कोहली भक्तीत तल्लीन, भाजपने व्हिडीओ शेअर करत उचलला फायदा

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

अजित पवार यांच्या बंगल्यावर देवगिरी निवासस्थानी ‘या’ केटर्सची नियुक्ती

अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते त्यांच्या देवगिरी या सरकारी बंगल्यावर आहेत. यासाठी छत्रधारी केटर्सची नियुक्ती करण्यात आली होता. देवगिरी, वर्षा आणि सागर बंगल्यावर सर्व खानपानाचा खर्च मिळून ६.५ कोटी पर्यंत पोहोचला आहे. ज्यावेळी अजित पवार हे विरोधीनेते होते तेव्ही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खानपानाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपानाबाबत सरकार किती खर्च करते याची माहिती नुकतीच ‘झी २४ तास’ या माध्यमानं दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी