28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमनोरंजनसुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणार चित्रपट? निर्मात्याने दिली माहिती

सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणार चित्रपट? निर्मात्याने दिली माहिती

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) सध्या आपल्यामध्ये नाही. १४ जून २०२० दिवशी त्याने आत्महत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र ती आत्महत्या होती की खून यावर अजूनही चौकशी सुरू आहे. यावर अजूनही ठोस पुरावा समोर आला नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुशांत सिंह राजपूतने आपले नाव एक उत्तम नट म्हणून यशाच्या शिखरावर नेलं आहे. सुशांत सिंह राजपूतवर सिनेमा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे आता सुशांत सिंह जरी आपल्यामध्ये नसला तरीही तो चाहत्यांच्या मनामध्ये जिवंत आहे. अशातच आता सुशांत सिंहवर सिनेमा बनवण्याबाबत निर्माता संदीप सिंह (Sandip singh) याने खुलासा केला आहे.

त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले. यामुळे आता त्याच्या आयुष्यावरही सिनेमा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आता बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याने याबाबत खुलासा केला असून संदीप चौधरी सुशांत सिंहचा मित्र आहे.

हे ही वाचा

अमोल कोल्हेंविरोधात उमेद्वार निवडून दाखवील; अजित पवारांचं ओपन चॅलेंज

अजित पवार म्हणाले, आता माझं वय झालं नाहीतर पोरं आणली असती

मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण, तारीख ठरली

सुशांत सिंहवर सिनेमा प्रदर्शित होणार?

सुशांत सिंह जाऊन आता तीनहून अधिक वर्षे झाली आहेत. याबाबत संदीप सिंहला सुशांत सिंहवर चित्रपट निर्माती करणार का? असा सवाल केला असता, संदीप सिंह उत्तरला आणि म्हणाला की, मी सुशांत सिंह राजपूतवर सिनेमा करणार नाही. यावेळी बोलताना दोन कारणं सांगितली आहे. एक म्हणजे त्याच्या आयुष्यावर सिनेमाची निर्मीती केल्यास त्याचं कुटुंब आणि चाहत्यांना या गोष्टींचा त्रास होईल. अनेकजण मला या चित्रपटाबाबत पैसे देखील देत आहेत. मात्र मी सुशांत सिंहच्या आयुष्यावर सिनेमा करणार नसल्याचं संदीप सिंहने स्पष्टोक्ती दिली आहे.

चाहते नाराज

निर्माता संदीप सिंह २०२४ मध्ये कमबॅक करणार असल्याचं म्हणाला आहे. त्याने सुशांत सिंहच्या आयुष्यावर चित्रपट होणार नसल्याचं सांगितलं आहे. अनेक चाहत्यांना समजताच, चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी