28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या चॅलेंजला अमोल कोल्हेंचा पलटवार

अजित पवारांच्या चॅलेंजला अमोल कोल्हेंचा पलटवार

आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर अजित पवार (Ajit Pawar) विरोधकांवर फुल ऑन फायर पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून ते विरोधकांवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत. शरद पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर हल्ला पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाकडून आगामी निवडणुकीची चांगली तयारी सुरु आहे. एवढंच नाही तर आता अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना लोकसभेमध्ये पाडणार असल्याचं खुलं आव्हान दिलं आहे. यासाठी मी विरोधकाला निवडून देणार असल्याचं ओपन चॅलेंज आता अजित पवार यांनी दिलं आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले की, दोन वर्षांआधी म्हणत होते की राजीनामा द्यायचा आहे. आता निवडणुका जवळ आल्या ते आता पदयात्रा काढत आहेत. कुणी संघर्ष यात्रा काढत आहेत. काढू द्या ज्याला त्याला लोकशाहीने अधिकार दिला आहे. एवढंच जर अलेस तर मागील पाच वर्षात का नाही लक्ष दिलं? असा सवाल अजित पवार यांनी केला. पण मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी निवडून आणलं, आता मीच विरोधकाला उभं करणार आणि पाडणार असं अजित पवार म्हणाले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून आता अमोल कोल्हेंनी अजित पवार यांना जशास तसा टोला लगावला आहे.

हे ही वाचा

सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणार चित्रपट? निर्मात्याने दिली माहिती

अमोल कोल्हेंविरोधात उमेद्वार निवडून दाखवील; अजित पवारांचं ओपन चॅलेंज

अजित पवार म्हणाले, आता माझं वय झालं नाहीतर पोरं आणली असती

काय म्हणाले अमोल कोल्हे?

अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं नाव न घेता उमेद्वाराला उभं करून अमोल कोल्हेंना पाडणार असल्याचं खुलं चॅलेंज दिलं आहे. अशातच अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांचे खुलं आव्हान स्विकारलं आहे. गेली पाच वर्षे मी काही केलं नव्हतं तर त्यावेळीच कान धरायचे होते. पदयात्रा काढली तर त्यात वाईट काय? असा सवाल आता अमोल कोल्हे यांनी केला आहे.

त्यांच्या आव्हानांना प्रतिआव्हान देणं, एवढा मी मोठा नेता नाही. दादा हे खूप मोठे नेते आहेत. मी साधा एक कार्यकर्ता आहे. पण जर मला शिरूरच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उतरवलं तर मी १०० टक्के नक्की या भागामध्ये निवडणूक लढवणार. शरद पावर यासंदर्भात जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं कोल्हे म्हणाले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी