26 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमनोरंजनविजय सेतुपतीने एका महिन्यात इतके वजन कमी केले की चाहत्यांना ओळखणे झाले...

विजय सेतुपतीने एका महिन्यात इतके वजन कमी केले की चाहत्यांना ओळखणे झाले कठीण

विजय सेतुपती याचा एक नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो पूर्वीपेक्षा पातळ दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

क्वचितच असे कोणी असतील ज्यांना दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय सेतुपती याच्याबद्दल माहित नसेल. विजय सेतुपती हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक नावाजलेला आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत विजयने दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्यासोबतच खलनायक म्हणून देखील काम केले आहे. सध्या विजय सेतुपतीची लोकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. विजय सेतुपतीने त्याच्या इंस्टाग्राम अकांउटला नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये विजय नेहमीपेक्षा खूप वेगळा दिसून येत आहे. अभिनेता विजय सेतुपतीने त्याचे बरेच वजन कमी केले आहे आणि त्याचे चाहते देखील त्याचे हे परिवर्तन पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. यापूर्वी, विजय सेतुपती यांना त्यांच्या शरीर आणि वजनाबद्दल अश्लील कमेंटचा सामना करावा लागला होता. आता या अभिनेत्याने आपल्या अप्रतिम परिवर्तनाने ट्रॉलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

विजय सेतुपती याचा एक नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो पूर्वीपेक्षा पातळ दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या व्हायरल फोटोमध्ये विजय हसत हसत आरशात सेल्फी काढताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत अंमली पदार्थाच्या तस्करीत झाली वाढ

सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव रिद्धी डोगराने केला शेअर

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

विजय सेतुपतीने त्याचा हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “व्वा काय बदल आहे.” दुसर्‍या यूजरने लिहिले, “मला वाटते की कोणीतरी तुमचे खाते हॅक केले आहे.” याशिवाय अनेक युजर्स या पोस्टवर फायर इमोजी देखील शेअर करत आहेत. वर्कफ्रंटवर, विजयला ‘विक्रम’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी चांगलीच पसंती मिळाली होती. विजयने आता ‘डीएसपी’ या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की विजय सेतुपती लवकरच ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय विजय लवकरच कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता, पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!