31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयशरद पवार राहुल गांधी यांची भेट; विरोधकांची मोट बांधण्यासाठी चर्चा

शरद पवार राहुल गांधी यांची भेट; विरोधकांची मोट बांधण्यासाठी चर्चा

शरद पवार यांच्या अदानीप्रकरणावरील वक्तव्यानंतर विरोधीपक्षांमध्ये बेवनाव असल्याच्या चर्चा झडू लागल्या असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट झाली. काल परवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पवार यांची भेट घेतली होती. तर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची देखील भेट झाली. त्यामुळे २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजुट बांधण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी सायंकाळी शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. बैठकीनंतर शरद पवार म्हणाले, मला वाटते सर्व विरोधीपक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद व्हायला हवा, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्याशी देखील संवाद होणे आवश्यक असून आम्हाला त्यांच्याकडे जावून चर्चा करायला हवी, विरोधकांच्या एकजूटीसाठी सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जावू असे देखील यावेळी पवार म्हणाले.

 

हे सुद्धा वाचा 
अकोला शहरात राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव

एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग

फुलंब्री सरपंचाच्या ‘पैसा फेक’ नौटंकीविरोधात आता राजपत्रित अधिकारी महासंघ मैदानात !

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांची एकजूट असल्याचे सांगितले. शरद पवार आज मुंबईतून भेटण्यासाठी आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याचे देखील गांधी यांनी यावेळी सांगितले. देश आणि लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही एकत्र लढणार असल्याचे देखील ते म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी