25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरवर दिसली शिवशंकराच्या डोक्यावरील चंद्रकोर
Array

मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरवर दिसली शिवशंकराच्या डोक्यावरील चंद्रकोर

देशभरात आज (दि.१८) महाशिवरात्री साजरी होत आहे. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आज शिवशंकराच्या मंदिरात जावून शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. शंभू महादेवाची स्तुती करताना, कैलासराणा शिव चंद्रमौळी ।फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी असे त्याचे वर्णन केलेले आहे. अशा या शिवशंभूच्या डोक्यावर झळाळणाऱ्या चंद्रकोरीचे दर्शन शनिवारी (दि.१८) रोजी पहाटे मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरवर झाले. पहाटेच्या शांत वातावरणात पिंताबरी प्रकाशात अतिशय कोरीव अशी ही चंद्रकोर अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टीपली. महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी सौम्य अशा प्रकाशात दिसणारी ही चंद्रकोर मनात अध्यात्माची भावना उत्पन्न करणारी ठरली. (Mahashivratri crescent moon on the head of Lord Shiva seen on Rajabai Tower of Mumbai University)

महाशिवरात्रीला मोठ्या भक्तीभावाने दिवसभर उपवास करुन रात्री शिवनामाचा जप करत जागर करुन भाविक भक्त शिवरात्र साजरी करतात. शिव महापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मध्यरात्री महादेव लिंगाच्या रूपात प्रकट झाले.
Mahashivratri crescent moon on the head of Lord Shiva seen on Rajabai Tower of Mumbai University Mahashivratri crescent moon on the head of Lord Shiva seen on Rajabai Tower of Mumbai University

त्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाने पहिल्यांदा शिवलिंगाची पूजा केली. यामुळे या दिवशी शिवरात्री साजरी केली जाते, असे मानले जाते. त्याशिवाय शंकर-पार्वती विवाह, शंकराने विष प्राशन केल्यानंतर कंठातील दाह कमी करण्यासाठी आपल्या माथ्यावर चंद्र धारण केला, अशा अनेक कथा सांगितल्या जातात.

Mahashivratri crescent moon on the head of Lord Shiva seen on Rajabai Tower of Mumbai UniversityMahashivratri crescent moon on the head of Lord Shiva seen on Rajabai Tower of Mumbai University

हे सुद्धा वाचा

Video : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पुण्यात ठाकरे-शिंदे गटामध्ये राडा; पोलिसांची धावाधाव

CBSE: विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या पालक-शिक्षकांना बसणार चोप!

समुद्र मंथनाच्यावेळी जे विष बाहेर पडले ते शंकराने प्राशन केले. त्यावेळी भगवान शंकराच्या कंठामध्ये दाह होऊ लागला. भयंकर विष प्राशन केल्याने कंठात उत्पन्न झालेला दाह थांबत नव्हता. त्याच वेळी समुद्रातून चंद्र देखील बाहेर आला. हा चंद्र महादेवाने आपल्या कपाळावर चंद्र धारण केला, अशी देखील आख्याईका सांगितली जाते. आज महाशिवरात्रीच्या दिवशी राजाबाई टॉवरवर दिसणारी चंद्रकोर देखील सौम्य प्रकाशात चमकत असताना अनेकांना शंभू महादेवाने आपल्या माथ्यावर धारण केलेल्या चंद्रकोरीचे रुप पाहिल्याची अध्यात्मिक अनुभूती अनुभवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी