30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमहाराष्ट्रपुण्यात ठाकरे-शिंदे गटामध्ये राडा; पोलिसांची धावाधाव

पुण्यात ठाकरे-शिंदे गटामध्ये राडा; पोलिसांची धावाधाव

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सत्तासंघर्षाच्या काळातील एक मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये देखील तणाव दिसून येत आहे. काल निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर काही काळातच कोकणात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, त्यानंतर आता पुण्यात देखील शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (दि.१८) रोजी पुण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. (Thackeray-Shinde group between Clash in Pune)

दरम्यान पुणे पोलिसांनी संवेदनशील परिस्थिती ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करत गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक असल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवताना पोलिसांची कसोटी लागली आहे.

हे सुद्धा वाचा

‘महिलांचा अनादर करणाऱ्यांना देव..’, कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

निवडणूक आयोग मोदींचे गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या शाखांवरुन आता राडेबाजी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कालच कोकणात शिवसेना शाखांवरुन दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने राज्यात ठिकठिकाणी संवेदनशील परिस्थिती निर्मान झाली आहे. पुण्यात देखील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आज आक्रमक झालेले पहायला मिळाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी