29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeखेड्यापाड्यातली मुले जपानी भाषेत बोलतात तेव्हा...
Array

खेड्यापाड्यातली मुले जपानी भाषेत बोलतात तेव्हा…

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता जपानी भाषेत वाचन, लेखन, संभाषण करण्यात प्राविण्यवत झाले आहेत. याचे सगळे श्रेय या शाळेतील एकमेव शिक्षक बालाजी जाधव यांना जाते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे. जाधव यांनी इयत्ता 1 ते 4 मधील 40 विद्यार्थ्यांना जपानी भाषा यशस्वीरित्या शिकवली. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी अधिकृतपणे उपस्थित राहून जपानी भाषेची परीक्षा देतील असे जाधव यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासासोबतच विविध भाषा शिकवण्‍याचा त्यांचा मानस आहे.

कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात देशात ऑनलाइन अभ्यासक्रमाची नवी खेळी सुरू झाली. यावेळी खेड्यात मात्र विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही खूप आव्हानांना सामोरे जावे लागले होते. यावेळी खेड्या-पाड्यातील शिक्षकांना मुलांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना फोनवर गोष्टी सांगणे सुरू झाले होते. याची दखल बऱ्याच वृत्तपत्रांनी घेतली होती. जपानमधील भारतीय वंशाचे भाषातज्ञ मुकुंद चासकर यांनी याबाबतचे वृत्त वाचल्यानंतर स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांना जपानी भाषा मोफत शिकवण्याची रुची असल्याचे सांगितले. भाषातज्ञ मुकुंद चासकरांच्या एका ईमेलने जाधव यांचा विदेशी भाषा शिकण्याचा आणि अध्यापनाचा प्रवास सुरू झाला.

जपानी भाषेत तीन प्रकारच्या लिपी आहेत. त्याचप्रमाणे पाड्यातील विद्यार्थ्यांना हिरागाना नावाच्या लिपीचा अभ्यासक्रम सुरू आहे. या लहानग्यांना मुळाक्षरांची पाच-सहा अक्षरे कळल्यानंतर त्यांच्याकडून फावल्या वेळेत शिक्षक जपानी भाषेचे वाचन-लेखन करून घेत असे. त्या अक्षरांपासून छोटे शब्द तयार करून ते वाचून, लिहून या मुलांनी वेग पकडला. विशेषतः काही मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते तीन आठवडे जपानी व्हिडिओ प्ले करून शिकवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर हळूहळू त्यांना जपानी भाषेतील संवाद दाखवायला सुरुवात केली गेली, ज्यात त्यांनाही रस निर्माण झाला. दरम्यान, माझे विद्यार्थी आता प्राणी, पक्षी, महिने, फळे, फुले, नातेवाईक इत्यादींची नावे जपानीमध्ये काढू शकतात. हे सर्व शिकण्यासाठी त्यांना सुमारे चार महिन्यांच्या कालावधी लागला असे लागले, असे जाधव यांनी अधोरेखित केले.

खेड्यापाड्यातली मुले जपानी भाषेत बोलतात तेव्हा...
Photo Caption- Google : ZP school students in Maharashtra learn Japanese

तालुक्यातील तहसील पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारी शाळांना खाजगी शाळांच्या पातळीवर आणण्याच्या प्रयत्नात जाधव यांच्या पुढाकाराचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. “मी जेव्हा या शाळेला भेट दिली तेव्हा मुलांची प्रगती पाहून मी थक्क झालो. ते जपानी इतक्या सुंदरपणे बोलतात की, जणू ती त्यांची मातृभाषा आहे,” असे पिसे यांनी सांगितले.

विशेषतः इयत्ता 4थी मधील विद्यार्थी प्रगत नरळेची आई, इंदिरा नरळे म्हणाल्या की, “मला खूप आनंद आणि अभिमान आहे की, माझे मूल जपानी भाषेत बोलू शकतो. आजपर्यंत आमच्या गावात एकाही शिक्षकाने असा प्रयत्न केलेला नाही. शाळा आणि जाधव सर आमच्या मुलांना देत असलेल्या संधींबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.”

विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड आणि प्रगती लक्षात घेता शिक्षक जाधव यांनी भारतातील जपानी वाणिज्य दूतावासाला पत्र लिहीत, जपानी भाषेच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. त्यांचे हे प्रयत्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे दर उघडतील आणि देशभरात अशाच प्रकारच्या विविध उपक्रमांचा मार्ग मोकळा करू शकतील, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

आजच्या समाजातील अनेक विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशननंतर परदेशात काम करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु त्यांना ज्या देशाच्या भाषेचे ज्ञान नसल्यामुळे ते काम करू इच्छितात त्यामुळे त्यांच्या संधी मर्यादित आहेत. हे लक्षात घेऊन, मी शाळेत जपानी भाषेचे धडे दिले, जे खूप यशस्वी ठरले आहेत. विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील जपानमधील संधी यावर अनेक भाष्ये असणारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऐकत आहे आणि वाचत आहे. हेच जपानी भाषा निवडण्याचे एक महत्वपूर्ण कारण आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा:

काय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी

जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोषण आहार बंद; चिमुकल्यांची होतेय उपासमार!

जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या ‘थेट भरती’ची प्रतीक्षा कायम

ZP school students in Maharashtra learn Japanese

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी