29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई :- एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केली. स्वप्निलच्या मृत्यूला ठाकरे सरकार जवाबदार आहे. हे सरकार खोट बोलतेय की स्थगितीमुळे स्वप्निल लोणकर बाबतीत दिरंगाई झाली. मुळात स्वप्नील लोणकरचा SEBC आरक्षणाशी काहीही संबंध नाही. स्वप्निलच्या मृत्यूचे ठाकरे सरकार राजकारण करत आहे असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे (Gopichand Padalkar serious allegations against Thackeray government).

स्वप्निल लोणकरच्या मृत्यूचे हे सरकार राजकारण करत आहे. मुळात स्वप्नील लोणकरचा SEBC आरक्षणाशी काहीही संबंध नाही असे म्हणत पडळकरांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, SEBC ची भरती सोडून उर्वरीत प्रक्रीया करण्याची कुठलीही स्थगिती मा. न्यायालयाने दिली नव्हती. हे सरकार खोट बोलतंय की स्थगितीमुळे स्वप्निल लोणकर बाबतीत दिरंगाई झाली. मुळात स्वप्नील लोणकरचा SEBC शी काही संबंध नाही. बहुजनाचा पोरगा आहे म्हणून हे प्रस्थापितांचे, असे ट्विट गोपीचंद पडळकरांनी केले आहे आणि या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेर केला आहे (Gopichand Padalkar and shared a video with this tweet).

धनंजय मुंडेंनी शब्द दिला होता, तो पाचच दिवसांत पूर्ण केला

प्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

काय म्हणाले पडळकर?

स्वप्निल लोणकरचा मृत्यू सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाला आहे. हे सरकार स्वप्निलच्या मृत्यूचे राजकारण करत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समोर थापा मारत आहेत. सभागृहाची आणि महाराष्ट्राची दिशाभूल ठाकरे सरकार करत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास्त करून स्वप्निलची नियुक्ती SEBC च्या आरक्षणावरून स्थगित झाली आहे, असे ठाकरे सरकारकडून सभागृहात सांगितले जाते. परंतु स्वप्निल आणि SEBC च्या आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही. तसेच SEBC आरक्षण सोडून बाकीच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीची न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही. स्वप्निल लोणकर हा बहुजनचा मुलगा आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाही त्याच्यावर अन्याय होत आहे असे गोपीचंद पडळकर म्हणत होते.

Gopichand Padalkar against Thackeray government
गोपीचंद पडळकर

यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले, सभागृहात त्यांनी दुसरी बाजू मांडली 31जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा आम्ही भरू असे स्टेटमेंट दिले होत. यानंतर सभागृहातून बाहेर आल्यावर म्हणतात, 31जुलैपर्यंत एमपीएससीच्या आम्ही जे सदस्य रिक्त आहेत त्या जागा भरू, म्हणजे सभागृहात वेगळे बोलतात आणि बाहेर वेगळे बोलतात. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विपर्यास्त करत आहेत. उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांचा दाखला देत हे स्वप्निलच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत. हे ठाकरे सरकारला निश्चितपणे महागात पडणार आहे. ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री दोन शब्द यावर बोलायला तयार नाहीत हे पळपुटे मुख्यमंत्री आहेत.

“केलं तुका झालं माका” संजय राऊत यांचा भाजपला टोला

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

आपले ते बाळ आणि दुसऱ्याच ते कारट हे या सरकारचे धोरण आहे. स्वप्निलच्या आईने दिलेला तळतळाट पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. परंतु हे ठाकरे सरकार अजिबात हळहळले नाही. स्वप्निलच्या मृत्यूचे राजकारण करतय, थापा मारतय आणि सभागृहात टाळ्या वाजवून घेत आहेत. मात्र, निश्चितपणे येत्या काही काळात महाराष्ट्रातील जनता या सरकारचा माज आणि मग्रुरी उतरवल्याशिवाय येत्या काही काळामध्ये राहणार नाही असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत (That is what MLA Gopichand Padalkar has said).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी