29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी शब्द दिला होता, तो पाचच दिवसांत पूर्ण केला

धनंजय मुंडेंनी शब्द दिला होता, तो पाचच दिवसांत पूर्ण केला

टीम लय भारी

मुंबई :- सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. यासाठी 01 जुलै रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा शब्द सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 5 दिवसातच पूर्ण केला आहे (Dhananjay Munde had given his word he fulfilled it in five days).

या शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगासंबंधीची सर्व कामे व सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित अन्य सर्व बाबी या नवीन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून, या कार्यासनास कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक, टंकलेखक आदी पदांसाठी अधिकारी–कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

“केलं तुका झालं माका” संजय राऊत यांचा भाजपला टोला

सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय 01 जुलै रोजी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी घेतला होता. हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली 21 प्रकरणे प्रलंबित आहेत, ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली निघावीत, सफाई कर्मचाऱ्यांचा घराचा अनुशेष भरून काढणे, वारसा हक्क कायदा, ठेकेदारी पद्धत बंद करणे यांसारखे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्ष पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.

हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या कुटूंबाला आधार

केंद्र शासनाने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 असून हा कायदा 6 डिसेंबर 2013 पासून देशात लागू आहे. या कायद्यातंर्गत दूषीत गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्राकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार 32 पैकी फक्त 11 जणांना याचा लाभ मिळाला आहे. तरी उर्वरीत 21 प्रकरणे ज्या पातळीवर प्रलंबित आहेत, त्याबाबत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत (Dhananjay Munde has directed the concerned departments to take immediate action).

नारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

Dhananjay Munde suffers setback as his upward surge halted by controversy

लाड पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी करण्याचे निर्देश

सफाई कामगारांच्या घरांचा 21 वर्षाचा अनुशेष भरून काढणे, सफाई कामगारांचे वारसा हक्क कायदे, सफाई कामांमधील ठेकेदारी पध्दती रद्द करणे, याबाबत नगरविकास विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती 8 दिवसात सामाजिक न्याय विभागाला सादर करावी, असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याशी संबधित सर्व कामगारांना सफाई कामगार हे पदनाम देवून लाड पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी करावी असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले आहेत (Dhananjay Munde has also instructed to implement the recommendations of Lad Paage Committee by giving the designation of cleaning workers).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी