30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यHealth Tips : या लोकांसाठी दुधाचे सेवन असते हाणीकारक

Health Tips : या लोकांसाठी दुधाचे सेवन असते हाणीकारक

दूध कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. मजबूत स्नायूंसाठी रोजच्या आहारात दुधाचा समावेश असणे आवश्यक आहे. शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते आणि दूध हे उत्तम दर्जाच्या प्रथिनांचा एक नैसर्गिक स्रोत आहे.

दूध हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. कॅल्शियम आणि फॉस्फरसचे उत्कृष्ट असे स्त्रोत आहे. जे मजबूत, निरोगी हाडे आणि दातांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. दूध हाडांचे आरोग्य देखील वाढवते. परंतु दूध कधी प्यावे हे आपल्याला माहिती नसतं. दुधात प्रोटीन, व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी -१२’ आणि ‘डी’ तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे. तसचे त्या विशिष्ट वेळी दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
दूध पिण्याचे फायदे
दुधामुळे स्नायूंचा विकास
दूध कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. मजबूत स्नायूंसाठी रोजच्या आहारात दुधाचा समावेश असणे आवश्यक आहे. शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते आणि दूध हे उत्तम दर्जाच्या प्रथिनांचा एक नैसर्गिक स्रोत आहे. दुधात 20 टक्के मट्ठा आणि 80 टक्के कॅसिन असते. मट्ठा अधिक सहजपणे अमीनो ऍसिडमध्ये रूपांतरित करून रक्तप्रवाहात शोषला जाते तर केसिन प्रथिने प्रक्रिया होण्यास जास्त वेळ घेते आणि पचण्यास हळू असते.
दूध त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेची काळजी घेण्यासाठी दूध हा एक उत्तम घटक आहे. अमीनो अॅसिड हे त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते आणि त्वचा मऊ ठेवण्यास
दूध हे फायदेशीर मानले जाते.
अॅसिडिटीमध्ये दूध उपयुक्त
दररोज दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. दुधात कॅल्शियम भरपूर असते जे हाडांसाठी सुपरफूड म्हणून काम करते परंतु, थंड दूध ऍसिड रिफ्लक्स दरम्यान ऍसिडिटी आणि जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.

हे सुध्दा वाचा

LPG: एलपीजी ग्राहकांसाठी मोठे बातमी ! घरगुती एलपीजी सिलेंडर लवकरच QR कोडसह

Health Tips : तेल मसाज अंघोळीपूर्वी करायचं की अंघोळीनंतर?, जाणून घ्या एका क्लिकवर

Drishyam 2 : अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली विक्रम

दूध पिण्याचे नुकसान
कच्चे दूध प्यायल्यास काय होते?
कच्चे दूध कधीही सेवन करू नये. दूध नेहमी उकळून कोमट प्यावे. कच्च्या दुधामुळे उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे डायरिया, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
फॅटी लिव्हरमध्ये दुधाचे सेवन नको
ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांनी दुधाचे सेवन टाळावे. कारण अशा लोकांना दूध पचायला त्रास होऊ शकतो. म्हणूनच फॅटी लिव्हर चा त्रास असणाऱ्यांना दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे यकृतातील चरबी, सूज आणि फायब्रॉइड्सची समस्या होऊ शकते.
दुधाच्या सेवनाने एलर्जी
बऱ्याचदा मुलांना दूध प्यायल्यानंतर उलटी होते असे सांगतात. मात्र, पालकांना हा मुलांचा बहाणा वाटतो. अनेकदा ही लक्षणे मिल्क अ‍ॅलर्जीची असू शकतात. मिल्क अ‍ॅलर्जीचा संबंध लॅक्टोज इन्टॉलरेन्सशी जोडला जातो. लॅक्टोज दूधामध्येही असते. दूधामध्ये असलेले प्रोटीन हे मिल्क अ‍ॅलर्जीचे मुख्य कारण असते. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठून श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शरीरावर सूज येणे. जर ऍलर्जीची समस्या असेल तर दुधाचे सेवन करू नये.
लठ्ठपणा
लठ्ठपणा जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही दुधाचे सेवन कमी केले पाहिजे. दुधात फॅट असते ज्याचे जास्त प्रमाण शरीरात तुम्हाला चरबी बनवू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी