29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeआरोग्य‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

निलम गोऱ्हेंच्या चुकीमुळे 700 ऐवजी 30 बेडचे रूग्णालय सुरू होणार

प्लेगच्या साथीत गोंदवलेकर महाराजांनी 26 जातींच्या गावकऱ्यांची रूग्ण सेवा केली होती, आताचे विश्वस्त जोपासताहेत जातीयवाद

टीम लय भारी

मुंबई : ‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर बंद असलेले आपले रूग्णालय सरकारच्या ताब्यात दिले आहे. ‘कोरोना’ रूग्णांना उपचारासाठी कसलेही सहकार्य करायचे नाही, अशी आडमुठी भूमिका घेतलेल्या ट्रस्टने ‘लय भारी’च्या बातम्यांनंतर अखेर नमते घेतले आहे ( Gondvalekar Maharaj trust handover hospital to Government ).

‘गोंदवलेकर महाराज मंदिर ट्रस्ट’च्या ठिकाणी 700 बेडचे रूग्णालय सुरू होणार होते. परंतु विधानपरिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यांनी 700 बेडचे संभाव्य रूग्णालय हाणून पाडले. त्यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे तिथे आता अवघे 30 बेडचे कोविड सेंटर उभे राहणार आहे ( Covid Center will be start at Gondvalekar Maharaj mandir trust )

माण – खटावमधील जनतेला मृत्यूच्या दाढेत देण्याच्या ट्रस्टच्या व निलम गोऱ्हे यांच्या या वृत्ती विरोधात ‘लय भारी’ने गेल्या चार दिवसांपासून बातम्यांचा सपाटा लावला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंदीर व्यवस्थापनाने रूग्णालय सरकारच्या ताब्यात दिले.

या रूग्णालयात अवघ्या 30 खाटांचे कोविड सेंटर उभे राहणार आहे. ऑक्सीजनच्या सुविधेसह तिथे हे सेंटर सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, तूर्त मंदीर ट्रस्टचे रूग्णालय ताब्यात घ्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. गरज पडली तर मंदीर परिसरातील भक्त निवासच्या काही इमारतीही ताब्यात घेऊ असे ट्रस्टला आम्ही कळविले असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

याबाबत माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. मंदीर परिसरातील काही इमारतींमध्ये मंदिराचे सेवेकरी व भाविक राहतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून भक्त निवासामध्ये ‘कोविड सेंटर’ उभारण्याचा निर्णय रद्द केला आहे. परंतु ट्रस्टच्या रूग्णालयात मात्र ‘कोविड सेंटर’ उभे केले जाणार असल्याचे देसाई म्हणाले ( Shambhuraj Desai said, Covid center will be start at Gondvalekar Maharaj Mandir ).

दहिवडी, म्हसवड अशा विविध ठिकाणी सामाजिक संस्था, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी कोविड सेंटर्स सुरू केली आहेत. या सेंटर्ससाठी खाटा, गादी, सतरंज्या अशा एकूण 200 बेडचे साहित्यही ट्रस्टने दिले आहे. जनभावना विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानेच ट्रस्टने ही नमती भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले ( Gondvalekar Maharaj trust on backfoot ).

गोंदवलेकर महाराजांनी प्लेगच्या साथीत केली होती रूग्णसेवा, आता हयात असते तर…

‘कोरोना’ रूग्णांसाठी मंदीर परिसरातील इमारती देण्यास विश्वस्तांनी कडाडून विरोध केला. आकांडतांडव व थयथयाट करून तेथील 700 बेडचे रूग्णालय हाणून पाडले. सध्याच्या स्थितीत गोंदवलेकर महाराज हयात असते तर त्यांनी केव्हाच या सगळ्या इमारती स्वतःहून रिकाम्या करून तिथे स्वतःच रूग्णालय उभे केले असते, अशा भावना गोंदवल्यातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

गोंदलेकर महाराज हयात असताना प्लेगची मोठी साथ पसरली होती. त्यावेळी महाराजांनी संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण गाव नदीपल्याड नेऊन वसविले होते. तिथे लोकांची राहण्याची, जेवणाची सोय केली होती. गोंदवलेत 26 प्रकारच्या जातीचे लोक राहतात ( Gondvalekar Maharaj helped to poor people ). त्यात दलितांसह अठरापगड जातीचे लोक होते. या सगळ्या जनतेची त्यांनी प्लेगच्या साथीत सेवा केली होती.

Gondvalekar maharaj was great social worker
गोंदवलेकर महाराज थोर समाजसुधारक होते

गोंदवलेकर महाराजांचा अस्पृश्यतेला विरोध होता. मानवता धर्म त्यांनी जपला होता. त्यांच्या हयातीत दोन वेळा दुष्काळ पडला होता. आताच्या रोजगार हमी योजनेच्या धरतीवर त्यांनी त्यावेळी लोकांना मदत केली होती. छोटे मोठे – तलाव, बांध – बंधाऱ्यांची कामे त्यांनी लोकांना दिली. त्याबदल्यात त्या व्यक्तीचे कुटुंब जगेल एवढे अन्नधान्य, जेवण यांचा पुरवठा केला होता. केवळ गोंदवलेच नव्हे तर, त्या संपूर्ण परिसरात गोंदवलेकर महाराजांनी समाजसुधारक म्हणून काम केलेले आहे.

गोंदवले व परिसरात ज्या ज्या वेळी आपत्ती आली, त्या त्या वेळी गोंदवलेकर महाराज लोकांच्या सेवेसाठी धावून गेले. प्लेगच्या गंभीर साथीत लोकांची सेवा त्यांनी केली. अठरा पगड जातीसाठी त्यांनी महान कार्य केले होते.

आताच्या विश्वस्तांना मात्र गोंदवलेकर महाराजांच्या कार्याशी देणेघेणे नाही. पुणे व बाहेरच्या असलेल्या या विश्वस्तांनी मंदिराला पूर्णपणे कर्मठ ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये जखडून ठेवले आहे. विश्वस्तांच्या या ब्राह्मणी वृत्तीची गोंदवले व परिसरात नेहमीच दबक्या आवाजात चर्चा होत असते. अशातच आता ‘कोरोना’ रूग्णांबद्दल विश्वस्तांची ‘अस्पृश्य’ वृत्ती उफाळून आली.

गोंदवलेकर महाराज हे अठरा पगड जातीचे तारणहार होते. त्यांच्या कार्यात, स्वभावात कुठेही ब्राह्मणीपणाचा लवलेशही नव्हता. परंतु त्यांच्या नावाने कार्यरत असलेल्या मंदीर व ट्रस्टने मात्र जातीयवादाची बजबजपुरी मांडली आहे ( Gondvalekar Maharaj trust responsible for Casteism ) .

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीसाच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो: रोहित पवार

गोंदवलेकर महाराज मंदिरातील कोविड सेंटर रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी शोधले वेगळे पर्याय

गोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

गोंदवलेकर महाराज चरित्र

विश्वस्तांचा जातीयवाद

मंदीराच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात जातीयवाद बोकाळला आहे. मंदीराच्या कामकाजात महत्वाच्या पदांवर ब्राह्मण समाजातील लोकांच्या नियुक्त्या केल्या जातात. विशेष म्हणजे, बाहेरून आलेल्या ब्राह्मण समाजालाच मंदीरात मानाचे पदांवरील कामे दिली जातात. स्थानिक ब्राह्मण व अठरापगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची कामे दिली जातात ( Gondvalekar Maharaj trust’s casteism ).

विश्वस्तांच्या विरोधात कुणी बोलू नये म्हणून गावातील काही मोजके चेले चपाटे व गाव गुंड वृत्तीचे काहीजण विश्वस्तांनी हाताशी धरले आहेत.

मंदिराच्या कार्यालयीन कामामध्ये ब्राह्मण समाजातील कर्मचाऱ्यांचे वर्चस्व आहे. बारा बलुतेदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र शेण काढणे, भांडी धुणे, चाऱ्याची जबाबदारी सांभाळणे, वायरमन, प्लंबिंग अशी दुय्यम दर्जाची कामे दिली जातात.

बाहेरून आलेल्या ब्राह्मण समाजातील कर्मचाऱ्यांना भरमसाठ मोबदला दिला जातो. पण स्थानिक ब्राह्मण व अठरा पगड जातीच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते.

विश्वस्तांचा हा जातीयवाद ‘गोंदवलेकर महाराजांच्या’ स्वभावाविरोधातील आहे. गोंदवलेकर महाराज हयात असते तर त्यांनी या विश्वस्तांची कधीच हकालपट्टी केली असती, अशा भावना या सूत्रांनी व्यक्त केल्या.

गोंदवलेकर महाराज मंदीर नव्हे, आरएसएसला जोपासण्याचे केंद्र

गोंदवलेतील विश्वस्तांचा मनमानीपणा वाढत चालला आहे. गोंदवलेकर महाराजांच्या कार्यालाच हे विश्वस्त हरताळ फासत आहेत. विश्वस्तांमध्ये स्थानिक पातळीवरील एकाही व्यक्तीचा समावेश नाही.

पूर्वी गाडगीळ नावाचे विश्वस्त होते. त्यांनी गोंदवलेकर महाराजांचे ( Gondvalekar Maharaj Trust ) कार्य खऱ्या अर्थाने पुढे नेले. पण गाडगीळ यांच्या पश्चात विद्यमान विश्वस्तांनी मंदिरात जातीयवाद वाढीस नेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एखादे केंद्र असावे अशा पद्धतीच्या स्वभावाची मंडळी तिथे कार्यरत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विश्राम पाठक, परांजपे, श्रीधर मनोहर व डॉ. विनोद गुळवणी हे चारजण या मंदिराचे विश्वस्त आहेत. महाराजांनी अठरा पगड जातीसाठी काम केले, आपत्ती काळात लोकांची सेवा केली. अशा पद्धतीचे गुण या चारही विश्वस्तांमध्ये नसल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

लोक कोरोना संकटात मरत आहेत. गोंदवले व परिसरात गेल्या चार दिवसांत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. विनोद सोनवणे (वय 35 ), मालोजी भोसले (53), श्रीमती कट्टे (85), दत्ता काशिद (32), बापूराव करे (50), नंदकुमार लिंगे (45), गणेश शिंदे (40), अण्णासाहेब माने (40), द्वारका कट्टे (70) अशा मृत्यू झालेल्या काहीजणांची नावे ‘लय भारी’च्या हाती आली आहेत.

Gondvalekar Maharaj was great social worker
गोंदवलेकर महाराजांनी प्लेगच्या साथीमध्ये रूग्णसेवा केली होती

एका मागोमाग एक लोकांचे मृत्यू होत असताना विश्वस्त मात्र मंदिर परिसरात कोविड सेंटर सुरू करण्यास विरोध करीत आहेत. प्रशासनाने 700 खाटांचे रूग्णालय सुरू केले असते, तर माण – खटावसह सातारा जिल्ह्यातील जनतेलाही त्याचा फायदा झाला असता. पण जातीयवादी वृत्तीच्या विश्वस्तांनी कोत्या मनोवृत्तीतून हे सेंटर हाणून पाडले.

गोंदवलेतील कारभाऱ्यांचा मुर्दाडपणा

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, मनमानी कारभार व जातीयवाद यावर गावच्या ग्रामपंचायतीने अंकुश ठेवायला हवा होता. अंगराज कट्टे, जयप्रकाश कट्टे यांच्यासह अनेकजणांची गोंदवले ग्रामपंचायतीवर सत्ता होती व आताही आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विश्वस्तांच्या ( Gondvalekar Maharaj Trust ) मनमानीला सत्ताधाऱ्यांनी लगाम घालायला हवा होता. विश्वस्तांना ग्रामपंचायतीची मदत लागेल तेव्हा ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी धावत त्यांच्या मदतीसाठी जातात. त्यांचे लांगूलचालन करतात. परंतु मंदिराचा कारभार अंधाधूंद पद्धतीने सुरू आहे. त्यावर हे कारभारी अवाक्षरही काढत नाहीत. ग्रामपंचायतीच्या या मुर्दाडपणामुळे विश्वस्त मुजोर झाल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

मंदिरांत आरएसएसधार्जिण्या कर्मचाऱ्यांचा निवास

मंदिरांमध्ये जवळपास 700 खोल्यांचे भक्त निवास आहे. या आपत्ती काळात सर्व मंदिरे बंद ठेवण्याचे राज्य सरकारने आदेश काढले आहेत. तरीही गोंदवलेकर महाराज मंदिर ट्रस्टने ( Gondvalekar Maharaj Trust ) साधारण 50 जणांना आतमध्ये ठेवलेले आहे. यातील बहुतांश जण हे आरएसएसधार्जिणे आहेत.

या आरएसएसवादी लोकांच्या हिताचे कारण पुढे करून मंदिराच्या विश्वस्तांनी ( Gondvalekar Maharaj Trust ) तिथे कोविड सेंटर सुरू होण्यास विरोध केला आहे. या 50 जणांच्या निवासाची इमारत वगळून इतर मोकळ्या खोल्या आम्हाला द्या असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही विश्वस्तांनी आपला पुणेरी पेशवे थाट सोडला नाही. निलम गोऱ्हे यांना हाताशी धरून त्यांनी प्रशासनाची जिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी