29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यफ्रिजमध्ये 'हे' पदार्थ चुकूनही ठेवू नका

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका

प्रत्येक गृहिणींचा समज असतो की, प्रत्येक पदार्थ फळं हे फ्रीजमध्ये ठेवल्याने अधिक काळ टिकतात. (foods should not be stored in fridge) त्यामुळं अनेक गृहिणींना फ्रिजमध्ये दिसेल तो पदार्थ ठेवण्याची सवय असतं. मग ते कोणतं फळ असो किंवा कोणता पदार्थ. मात्र असेही काही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आरोग्याला नुकसान पोहचू शकते तसंच, ते पदार्थही खराब होऊ शकतात. याबाबत बॉलिवडूची मस्तानी दीपिका पदुकोणची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. तर जाणून घेऊयात कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत. (Health Tips which foods should not be stored in fridge)

चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवल्यास इतर पदार्थांना त्याचा गंध लागतो. त्याचबरोबर फ्रीजमधील दमट हवेमुळं शुगर ब्लूम होते. ज्यामुळं चॉकलेटचा स्वाद फिका पडू शकतो.

बटाटा ही भाजी स्टार्चयुक्त आहेत. ज्या कोरड्या वातावरणात वाढतात. रेफ्रिजरेशनमुळे स्टार्चचे शर्करामध्ये रूपांतर वेगाने होते ज्यामुळे बटाटे चवीला गोड होतात. ज्याचा शरिरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका.
लसूण चुकूनही फ्रीजमध्ये स्टोर करु नका. १२ तासांनंतर लसूण सुकायला सुरुवात होते. लसूण आतून रबरासारखा होतो. त्यामुळं लसूण फ्रीजमध्ये ठेवू नका.

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण असे केल्याने कांदा आपला ओलावा कमी होतो. त्याचबरोबर कांद्याची चवही कमी होते. तसेच कालांतराने त्याला बुरशी लागते. फ्रीजमध्ये कांदा ठेवल्याने इतर पदार्थांना कांद्याचा वास येतो.

बहुतांश लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने त्यांची चव, फ्लेवर आणि रस नष्ट होतो. या एका चुकीमुळे टोमॅटो मधील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते रूम टेम्परेचर मध्येच ठेवावेत. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो तसेच राहतात व जास्त काळ टिकतात.

काळी मान उजळण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

शिमला मिरची फ्रीज मध्ये ठेवत असाल तर ही सवय ताबडतोब बंद करा. कारण, कमी तापमानात शिमला मिरचीची स्कीन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा कमी होतो. ज्यामुळे शिमला मिरचीची चव पूर्णपणे नष्ट होते. शिमला मिरची ही अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते. पण गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीज मध्ये ठेवली जाते.

काकडी थंड असते. त्यामुळे तिच्या अति सेवनानं खोकला, सर्दी होते. म्हणूनच ती फ्रीजमध्ये ठेवून अधिक थंड करू नये. त्याचबरोबर तिच्यामधील पोषणमूल्येही कमी होतात. म्हणून ती फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून सामान्य तापमानातच खावी.

काही घरांमध्ये ड्रायफ्रूट्स एअर टाईट बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्येही साठवले जातात. हे करण्याची गरज नाही, ते फ्रीजशिवाय बरेच महिने चांगले राहतात. जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा.

बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आलं आणल्यानंतर बहुतेक लोक ते धुवून फ्रीजमध्ये ठेवतात. कारण आलं जास्त काळ सुकत नाही आणि जेव्हा ते सुकते तेव्हा ते कोरडे होते. जे तुम्ही बारीक करून किंवा फोडणी करून वापरू शकता. फ्रिजमध्ये ठेवताना आले थोड्या वेळाने त्याची चव किंवा पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी