30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात आंबा खाताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

उन्हाळ्यात आंबा खाताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

उन्हाळ्यात (health care Summer) आंबा खायला कोणाला आवडत नाही? चव आणि पौष्टिकतेच्या दृष्टीनेही आंबा भारीच आहे. त्यामुळे आंब्याला (Mango) फळांचा राजा असं म्हटले जाते. उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असल्यामुळे किती आंबे खाऊ आणि किती नको असे आंबा प्रेमींना होतं असते. वर्षातून एकदा येणा-या या रसाळ फळाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हा आंबा खाताना कशाचीही पर्वा न करता यावर तुटून पडतात. पण आंबा खाताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. आंबा खाताना काही गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होत नाही. (health care Be careful when eating mangoes)

आंब्याच्या आत अनेक पोषक घटक आढळतात. फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 असते. आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धा तास आधी थंड पाण्यात भिजत ठेवावा ज्यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि तो पचन्यास जड जात नाही. सालीसकट आंबा खाणेही शरीरासाठी चांगले असते.

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका

जेवणाआधी अथवा नंतर आंबा खाणे शक्यतो टाळा. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. आंब्यावर सुरकुत्या आल्या असतील तर समजावा तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे आणि खाण्यास योग्य आहे.

आंबा कापण्यापूर्वी त्याला कुठे बारीक छिद्र आहे की नाही ते तपासावे. तसे असल्यास समजावे की आंब्याला किड लागली आहे आणि तो खाण्यायोग्य नाही.

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक अजिबात पिऊ नयेत. आंबा आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतल्यास पोटात घातक रिअॅक्शन निर्माण होऊ शकते.

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. कारण, आंबा आणि दही मिळून पोटात जास्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो.

आंबा किंवा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे फळ पचायला जास्त वेळ लागतो किंवा त्यामुळे अपचनाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पोटात गॅस, पोटदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी