33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकर्नाटकात करोनाचं थैमान; एकाच शाळेतील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकात करोनाचं थैमान; एकाच शाळेतील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

टीम लय भारी

कोडगू: कर्नाटकमध्ये करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गातील आहेत(Karnataka, Corona has once again raised concerns)

जवाहर नवोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. शाळेतील १० विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणं जाणवत असून २२ विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नाही आहेत. एका कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे.

Tadap: फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

शेहनाज गिलची दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी खास पोस्ट

या कर्मचाऱ्याला करोनाची लक्षणं जाणवत आहेत. दरम्यान या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शाळेत एकूण २७० विद्यार्थी असून सर्वांची करोना चाचणी करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून चिंता करण्याचं काही कारण नाही.

राज्यातील ‘हे’ मंत्री पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus India Highlights: India Reports 13,451 New Coronavirus Cases In 24 Hours

शाळेच्या संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून इतर सर्व काळजीही घेतली जात आहे. दरम्यान यामुळे शाळेचं टाइमटेबल बिघडलं असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे”.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी