33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्यदिवसाची सुरुवात उत्साहात करण्यासाठीचे 'हे' आहेत काही उत्तम पर्याय

दिवसाची सुरुवात उत्साहात करण्यासाठीचे ‘हे’ आहेत काही उत्तम पर्याय

रात्रभर झोप असूनही सकाळी उठल्यासारखे वाटत नाही. आणि उठलो तरी आदल्या दिवशीचा थकवा दूर होत नाही. सकाळीही थकवा जाणवतो. हात-पायांमध्ये ताकद नाही असे दिसते. या स्थितीला तुमची दिनचर्या जबाबदार आहे. जर तुम्हाला सकाळी उर्जेने उठवायचे असेल तर तुम्हाला आधी रात्रीची व्यवस्था सुधारावी लागेल. याबाबतचेच काही सल्ले या लेखामार्फत आम्ही तुम्हाला देत आहोत.

आपल्यापैकी प्रत्येकाला सकाळी उठायच्या वेळी अंगात आळस भरून येतो. विशेष म्हणजे अनेकजण वाजत असलेलायगजर बंद करून 5 ते 10 मिनिटाची अधिकची झोप घेत असतात. या सर्व प्रक्रियेमुळे आपल्याला सकाळी वाटणारी प्रसन्नता हरवत चालली आहे. महत्त्वाच म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जिवनात प्रत्येक व्यक्तीच्या अंगात आळस ठासून भरलेला आहे. आणि रात्रीच्या वेळात झोप चांगल्या पद्धतीने पूर्ण न झाल्याने हा आळस वाढत राहतो आणि पर्यायाने त्याचा परिणामा आरपल्या कामावर होऊ लागतो. अनेकवेळा असे घडते की रात्रभर झोप असूनही सकाळी उठल्यासारखे वाटत नाही. आणि उठलो तरी आदल्या दिवशीचा थकवा दूर होत नाही. सकाळीही थकवा जाणवतो. हात-पायांमध्ये ताकद नाही असे दिसते. या स्थितीला तुमची दिनचर्या जबाबदार आहे. जर तुम्हाला सकाळी उर्जेने उठवायचे असेल तर तुम्हाला आधी रात्रीची व्यवस्था सुधारावी लागेल. याबाबतचेच काही सल्ले या लेखामार्फत आम्ही तुम्हाला देत आहोत.

– बॉडी क्लॉकची काळजी घ्या
तुम्ही घड्याळ बघून झोपत असाल किंवा उठत असाल, पण या संपूर्ण प्रक्रियेत बॉडी क्लॉकची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा अर्धा तास जास्त किंवा कमी असणे ठीक आहे. पण रोजची वेळ बदलत राहते त्यामुळे तुम्हाला सकाळी उत्साही वाटत नाही.

हे सुद्धा वाचा

हा महिला दिन ‘त्या’ महिलांना समर्पित…; महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

विधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच…

– गॅझेट दूर ठेवा
झोपण्याच्या किमान एक तास आधी सर्व प्रकारचे गॅझेट वापरणे थांबवा. झोपताना मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप पाहिल्याने मनाला पूर्ण आराम वाटत नाही आणि शरीर थकलेले राहते.

– तुम्हाला जे आवडते ते करा
झोपण्यापूर्वी असे काम करा ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. चांगलं पुस्तक निवडा, ते वाचताना झोपा. जर एखाद्याला संगीताची आवड असेल तर सुखदायक संगीत ऐकत झोपू शकते.

– त्वचा स्वच्छ केल्यानंतर झोपा
रात्री झोपताना आपल्या शरीरातील पेशी टवटवीत होतात. शरीर स्वतःची दुरुस्ती करते. म्हणूनच रात्री झोपताना चेहरा, हात-पाय स्वच्छ करून झोपा. जेणेकरून तुमची त्वचाही रिलॅक्स होऊ शकते आणि तुम्हाला सकाळी फ्रेश वाटू शकते.

– तापमान सामान्य ठेवा
झोपताना लक्षात ठेवा की तुमच्या खोलीचे तापमान जास्त थंड किंवा जास्त गरम नसावे. तुम्ही एसी किंवा हीटर चालवत असाल तर दोन्हीही मध्यम तापमानात ठेवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी