33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाचौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज ! प्लेइंग 11 मध्ये करणार...

चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज ! प्लेइंग 11 मध्ये करणार ‘हे’ बदल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणि ही मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा परिस्थितीत, चौथ्या कसोटीपूर्वी, कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरू शकते ते जाणून घ्या.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेला शेवटचा सामना अत्यंत निर्णायक ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणि ही मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा परिस्थितीत, चौथ्या कसोटीपूर्वी, कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरू शकते ते जाणून घ्या.

शमीचे पुनरागमन निश्चित
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंदूर कसोटीचा भाग नव्हता, मात्र अहमदाबाद कसोटीत या वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. अहमदाबाद कसोटीत मोहम्मद शमीचे पुनरागमन झाल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागू शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, भारताचा अनुभवी स्टार वेगवान गोलंदाज शमी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आल्याने त्याचाही फायदा संघाला होणार आहे.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक : ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

जसप्रीत बुमराह वर्ल्डकप खेळणार? मोठी अपडेट आली समोर

देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

शमीशिवाय टीम इंडियामध्ये आणखी एक मोठा बदल ईशान किशनच्या रूपाने होऊ शकतो. किशनला भारताचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. केएस भरतच्या जागी किशन संघात सामील होऊ शकतो. वास्तविक केएस भरतला आतापर्यंत मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही, या मालिकेत त्याची बॅटही पूर्णपणे शांत झाली आहे. अशा स्थितीत अहमदाबाद येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत त्याला वगळले जाऊ शकते.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11 काय असू शकतात
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पिटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी, कुह्नेमन, नेथॉन लियॉन, मिचेल स्टार्क, टॉम मर्फी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी